-
देशात पहिल्यांदाच सर्वोच्च न्यायालयाने एका समलैंगिक व्यक्तीची उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती होण्यासाठी शिफारस केलीय. सरन्यायाधीश एन. व्ही. रमण यांच्या अध्यक्षतेखालील कॉलेजियमने हा ऐतिहासिक निर्णय घेतलाय.
-
सौरभ कृपाल हे सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील आहेत. सर्वोच्च न्यायालयाने ज्या याचिकेची सुनावणी करताना देशात समलैंगिक संबंधांना मान्यता देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला त्या याचिकेत सौरभ कृपाल हे वकील होते.
-
सौरभ कृपाल हे भारताचे माजी सरन्यायाधीश भुपिंदर नाथ कृपाल यांचे पुत्र आहेत. भुपिंदर नाथ कृपाल २००२ मध्ये सरन्यायाधीश होते.
-
सौरभ कृपाल यांनी जगप्रसिद्ध ऑक्सफर्ड आणि केंब्रिज विद्यापीठात आपलं शिक्षण घेतलं. त्यानंतर मागील २ दशकांपासून ते वकिली करत आहेत.
-
सर्वात आधी दिल्ली उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश गिता मित्तल यांच्या अध्यक्षतेखालील उच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने ऑक्टोबर २०१७ मध्ये सौरभ कृपाल यांच्या न्यायाधीश म्हणून नियुक्तीसाठी नावाची शिफारस केली. मात्र, पुढे २०१८ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने सौरभ कृपाल यांच्या नावाची शिफारस केली नव्हती.
-
यानंतर पुन्हा जानेवारी २०१९, एप्रिल २०१९ आणि ऑगस्ट २०२० मध्ये सौरभ कृपाल यांच्या नावाची उच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने शिफारस केली.
-
यानंतरही सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमकडून त्यांच्या नावाची शिफारस न झाल्यानं टीकाही झाली. तसेच कृपाल समलैंगिंक असल्यानंच त्यांची शिफारस होत नसल्याचा आरोप झाला.
-
केंद्र सरकारने सौरभ कृपाल यांच्या नावाचा विरोध करताना त्यांचे जोडीदार युरोपियन असून ते स्वीस दुतावासात काम करत असल्याचं कारण सांगितलं.
-
मार्च २०२१ मध्ये दिल्ली उच्च न्यायालयाच्या सर्व ३१ न्यायाधीशांनी एकमताने सौरभ कृपाल यांची ज्येष्ठ वकील म्हणून नियुक्ती केली.
-
सौरभ कृपाल ‘सेक्स आणि सुप्रीम कोर्ट’ (Sex and the Supreme Court) या पुस्तकाचे लेखक आणि संपादकही आहेत.
-
या पुस्तकात अनेक प्रसिद्ध न्यायाधीशांनी आणि वकिलांनी लेख लिहिले आहेत.
-
कृपाल यांनी संयुक्त राष्ट्रासोबतही काम केलं आहे.

पत्नी, मुलासमोर दहशतवाद्यांनी डोंबिवलीतील पर्यटकाच्या डोक्यात गोळ्या झाडल्या, मुलावर वडिलांचा मृतदेह पाहण्याची वेळ