-
सीमेवर भारताला वारंवार डोळे दाखवणाऱ्या चीनला आता जरब बसणार आहे. कारण भारतीय हवाई दलाची ताकद वाढत आहे. तेजस फायटरला आता हॅमर क्षेपणास्त्राची जोड मिळाली आहे. यामुळे भारतीय हवाई दलाचा निशाणा अचूक आणि वेगवान झालाय.
-
फ्रान्सने भारताला हॅमर क्षेपणास्त्राचा पुरवठा केलाय. हे क्षेपणास्त्र आता एलसीए तेजस या युद्धविमानात (LCA Tejas Fighter) बसवण्यात येतील. यामुळे शत्रुचे बंकर तब्बल ७० किलोमीटर दूरवरूनच उद्ध्वस्त करता येणार आहेत. म्हणूनच बालाकोट सर्जिकल स्ट्राईकसारख्या मोहिमा करणं हवाई दलाला सोपं जाणार आहे.
-
भारताने फ्रान्सकडे तेजस युद्धविमानांसाठी तातडीने हॅमर क्षेपणास्त्रांची मागणी केली होती. यानुसार आता हा पुरवठा होत आहे. हेच क्षेपणास्त्र राफेल युद्धविमानांमध्ये देखील वापरण्यात आलेत.
-
भारताकडे तेजसच्या जोडीला ही क्षेपणास्त्र आल्यानं आता चीन सीमेवर हिमालयात अधिक उंच भागातही अचूक हल्ला करत शत्रुचे बंकर उद्ध्वस्त करता येणार आहे. सरकारने तेजसचे २ स्कॉड्रन देखील तैनात केलेत. आणखी ४ स्कॉड्रनची तैनात केली जाणार आहे.
-
भारताचं तेजस फायटर चीनच्या स्वदेशी जेएफ १७ फायटरला प्रत्युत्तर देण्यास सक्षम आहे. हॅमर क्षेपणास्त्राने तर तेजसची ताकद अनेक पटीने वाढलीय. कारण आता अचूक मारा करता येणार आहे.
-
हॅमर क्षेपणास्त्र हवेतून जमिनीवर मारा करण्यासाठी वापरलं जातं. त्याचं एकूण वजन हे ३४० किलो आहे. त्यात मूळ स्फोटकांचं वजन २५० किलो असतं. त्याच्या टोकाला समोर नेव्हिगेशन आणि गाईडन्स सिस्टम बसवलेली असते. हे क्षेपणास्त्र १०.२ फूट लांब आहे.
-
हे क्षेपणास्त्राचं इंजिन सॉलिड रॉकेट मोटर आहे. त्याचा वापर सामान्यपणे अंतराळातील रॉकेटमध्ये केला जातो. या क्षेपणास्त्राची परिणामकारता इतकी आहे की जर अपवादात्मक स्थितीत क्षेपणास्त्र आणि टारगेटमध्ये ३ ते ३२ फूटाचं अंतर राहिलं तरी टारगेट उद्ध्वस्त होईल.
-
हॅमर क्षेपणास्त्र २७५० मीटर प्रति सेकंद वेगाने उडतं. ते १२५, २५०, ५००, १००० किलोग्रॅम अशा वेगवेगळ्या वजनात उपलब्ध आहे.
-
एकदा का हे क्षेपणास्त्र डागलं की ते आपोआप आपल्या लक्ष्याला शोधून उद्ध्वस्त करतं. म्हणूनच फायर अँड फॉरगटचा नियम त्याला लागू होतो.
३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख