-
दरवर्षी जगभरात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या २०० पासवर्डची यादी जाहीर होते. यात भारतातील पासवर्डचाही समावेश आहे.
-
यंदाच्या या यादीत पहिल्या १० पासवर्डमध्ये पहिल्या क्रमांकावर १२३४५६ या पासवर्डचा क्रमांक आहे.
-
या अहवालात ५० देशांमधील पासवर्डचा अभ्यास करण्यात आलाय. त्यातील ४३ देशांमध्ये सर्वाधिक वापरला जाणारा पासवर्ड १२३४५६ हा आहे.
-
दुसरीकडे भारतात सर्वाधिक पासवर्ड आहे ‘password’.
-
यानंतर भारतात वापरल्या जाणाऱ्या पासवर्डमध्ये २३४५, १२३४५६, १२३४५६७८, १२३४५६७८९, india१२३, १२३४५६७८९०, १२३४५६७ आणि qwerty यांचा समावेश आहे.
-
याशिवाय भारतात “iloveyou”, “krishna”, “sairam” and “omsairam” हे पासवर्ड देखील फार प्रमाणात वापरले जातात.
-
भारतात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या २०० पैकी ६२ पासवर्ड एका सेकंदापेक्षा कमी वेळेत क्रॅक करता येण्यासारखे आहेत. हे प्रमाण ३१ टक्के आहे.
-
जगाचा विचार करता सेकंदात क्रॅक करता येणाऱ्या पासवर्डचं प्रमाण ८४.५ टक्के आहे.
‘छावा’च्या कलेक्शनमध्ये ९ व्या दिवशी मोठी वाढ! दुसऱ्या शनिवारी कमावले तब्बल…; ‘या’ ३ शहरांमध्ये सर्वाधिक कमाई