-
राजस्थानमध्ये अखेर मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला.
-
यात तब्बल १५ मंत्र्यांचा समावेश करण्यात आलाय. यात ११ कॅबिनेट आणि ४ नव्या राज्यमंत्र्यांचा समावेश आहे.
-
शुक्रवारी (१९ नोव्हेंबर) माजी शिक्षणमंत्री गोविंद सिंग दोतासरा यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला.
-
मुख्यमंत्री गेहलोत यांनी शनिवारी राज्यपाल कलराज मिश्रा यांची भेट घेऊन मंत्र्यांचे राजीनामे सुपूर्द केले.
-
राजस्थान मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर राजीनाम्याची घोषणा करण्यात आली. शनिवारी सायंकाळी ७ वाजता मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी ही बैठक बोलावण्यात आली होती.
-
सर्व नवीन मंत्र्यांना रविवारी दुपारी २ वाजता काँग्रेस मुख्यालयात पोहोचण्यास सांगण्यात आले होते.
-
हेमाराम चौधरी, महेंद्रजित सिंग मालवीय, रामलाल जाट, महेश जोशी, विश्वेंद्र सिंह, रमेश मीना, ममता भूपेश बैरवा, भजनलाल जाटव, टिकाराम जुली, गोविंदराम मेघवाल, शकुंतला रावत यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली.
-
जाहिदा, बृजेंद्र सिंह ओला, राजेंद्र गुढा, मुरारीलाल मीणा यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पहिल्यांदाच राजस्थानमध्ये मंत्रिमंडळात ४ दलित मंत्री झालेत. याशिवाय अनुसूचित जमातीच्या ३ मंत्र्यांचाही मंत्रिमंडळात समावेश झालाय.
-
मंत्रिमंडळात सचिन पायलट यांच्या गटातील ५ जणांना स्थान देण्यात आले. यामध्ये हेमाराम चौधरी, विश्वेंद्र सिंह, रमेश मीणा यांचा समावेश आहे.
-
याआधी पायलट गटातील ३ जण मंत्रिमंडळात होते.
-
मुरारी लाल मीणा आणि ब्रिजेंद्र सिंग ओला यांना राज्यमंत्री करण्यात आले.
-
पायलट यांच्याऐवजी गुज्जर समाजातून आलेल्या रावत यांना संधी देण्यात आली.

शनीदेव घेऊन आले सुखाचे दिवस; मकर राशीची साडेसाती संपताच ‘या’ तीन राशींना गडगंज श्रीमंतीचे सुख लाभणार