-
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री राहिलेले एन. डी. तिवारी (ND Tiwari) कायमच चर्चेत राहिलेत. ही चर्चा त्यांच्या मुख्यमंत्रीपदापासून पंतप्रधान पदाच्या दावेदारीपर्यंत आणि अगदी लग्न आणि मुलाबाबतही झालीय. मात्र, आज त्यांच्या आयुष्यातील अशा प्रसंगाची ज्यात ते स्वतः नियुक्त केलेल्या सचिवालाच विसरले.
-
एन. डी. तिवारी राजकारणात सर्वच मोठ्या नेत्यांचे निकटवर्तीय राहिलेत. यात मुलायम सिंह यादव यांच्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा समावेश आहे. एन. डी. तिवारी सोनिया गांधीपासून मनमोहन सिंग यांच्यापर्यंत देखील जवळचे मानले गेले.
-
एन. डी. तिवारी यांचा आशिर्वाद आणि सहकार्यामुळे अनेक नेते उच्च पदांपर्यंत पोहचू शकले.
-
मात्र, म्हातारपणात तिवारी यांना विसरण्याचा आजार (अल्झायमर) जडला. या काळात ते माणसांची नावं आणि त्यांची कामं असं सर्वच विसरत होते.
-
एन. डी. तिवारी तीन वेळा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री (१९७६-७७, १९८४-८५, १९८८-८९) होते आणि एकदा उत्तराखंडचे मुख्यमंत्री राहिले.
-
उत्तराखंडचे मुख्यमंत्री असताना तिवारी सचिवाला नियुक्त करून विसरून गेले होते.
-
सचिव दुसऱ्या दिवशी फाईल घेऊन आले. तेव्हा तिवारींनी त्यांना बसायला सांगितलं, नाश्ता दिला आणि घरच्या बाहेरच्या गप्पा मारल्यानंतर तुम्ही काही काम घेऊन आले होते का असं विचारलं. यावर सचिवांनी तिवारींसमोर फाईल ठेवल्या. यावर तिवारींनी त्यांना या सरकारी फाईल तुमच्याकडे कशा आल्या असा प्रश्न विचारला.
-
शेवटी सचिवांनी तिवारींना त्यांनीच सचिव म्हणून नेमणूक केल्याची आठवण करून दिली. यानंतर तिवारींसोबत व्यक्तींची ओळख आणि त्यांचं काम याची आठवण करून देण्यासाठी खास माणूस नेमण्यात आला. (Photos: Social Media)
५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ