-
१. मला सत्तेत राहण्याच्या शुभेच्छा देऊ नका. मी आजही सत्तेत नाही आणि भविष्यातही सत्तेत जायची इच्छा नाही. मला केवळ सेवेत राहायचं आहे. माझ्यासाठी पंतप्रधान पद या सर्व गोष्टी सत्तेसाठी नाहीच, तर सेवेसाठी आहे : पंतप्रधान मोदी
-
२. लोकांना आयुष्मान भारत योजनेची माहिती नसते. आजूबाजूला जितके गरीब कुटुंब आहेत त्यांना आयुष्मान भारत योजनेची कशी मदत झाली याची माहिती द्या. तसेच त्यांनाही असं कार्ड बनवण्यास सांगा. जेणेकरून त्यांच्या कुटुंबात काही संकट आलं तर त्यांना मदत होईल : पंतप्रधान मोदी
-
३. आज गरीबाला औषधांशिवाय अडचण यावी हे योग्य नाही. पैशांमुळे गरीबांना औषधं घेता न येणं किंवा उपचार न मिळणं ही काळजी करण्यासारखी गोष्ट आहे. त्यामुळे अशा गरीबांना मदत करा आणि घराघरात आयुष्मान भारतची माहिती द्या : पंतप्रधान मोदी
-
४. जेव्हा आपण निसर्गाचा समतोल बिघडवतो तेव्हाच आपल्याला निसर्गापासून धोका आहे. आपल्याला निसर्गाचं पावित्र्य राखलं पाहिजे. आपल्या आजूबाजूच्या नैसर्गिक संसाधनांचा काटकसरीने वापर करा आणि त्यांना आपल्या मूळ रुपात येण्यास मदत करा : पंतप्रधान मोदी
-
५. आपल्या आजूबाजूला जे नैसर्गिक स्रोत आहेत, ते आपण जपले पाहिजेत, त्यांना पुन्हा मूळ स्वरूपात आणले पाहिजे. यातच आपल्या सर्वांचे हित आहे, जगाचे हित आहे. जेव्हा आपण निसर्गाचे रक्षण करतो, त्या बदल्यात निसर्गही आपले संरक्षण करतो, आपल्याला सुरक्षा प्रदान देतो. अनेकदा वैयक्तिक आयुष्यातही आपल्याला हे अनुभवता येते : पंतप्रधान मोदी
-
६. समुद्री किनारपट्टी भागात जमीन पाण्याखाली जाण्याचा धोका असतो. तुतुकुडीत देखील असे बेट होते जे बुडण्याचा धोका वाढला. यानंतर तेथील नागरिकांनी आणि तज्ज्ञांनी निसर्गाच्या मदतीनेच त्यावर उपाय शोधला. त्यांनी पाल्मेराची झाडं लावली. ही झाडं तुफान वादळातही जमिनीचं संरक्षण करतात : पंतप्रधान मोदी
-
७. आपल्या देशाचं महारत्न असलेली ओएनजीसी (ONGC) स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वेगळ्या पद्धतीने साजरा करत आहे. यात ते आपल्या विद्यार्थ्यांसाठी खनिज तेलाच्या खाणी असलेल्या भागात अभ्यास दौरा आयोजित करत आहेत. यामुळे त्यांना माहिती मिळून तेही राष्ट्र निर्माणाच्या कामात सहभागी होतील : पंतप्रधान मोदी
-
८. युवकांनी समृद्ध प्रत्येक देशासाठी Ideas आणि Innovation, जोखीम पत्करण्याची तयारी आणि Can Do Spirit म्हणजेच काम पूर्ण करण्याची जिद्द महत्त्वाची असते. हीच तरुणांची ओळख बनते : पंतप्रधान मोदी
-
९. हे स्टार्ट अपचं युग आहे आणि या स्टार्ट अपच्या युगात भारत एकप्रकारे जगाचं नेतृत्व करत आहे : पंतप्रधान मोदी
-
१०. करोना अजून गेलेला नाही हे कधीच विसरू नका. सतर्कता बाळगणे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे : पंतप्रधान मोदी

अमरावती ते मुंबई विमान प्रवासाचे वेळापत्रक, तिकीट दर जाहीर; फक्त…