-
महात्मा फुले यांच्या स्मृतीदिनानिमित्त पुण्यातील समता भूमी, फुले वाडा येथे छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले.
-
यावेळी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली समता पुरस्कार वितरण कार्यक्रम झाला.
-
या कार्यक्रमात बोलताना छगन भुजबळ यांनी ‘सौ दर्द छुपे है सिने में… मगर अलग मजा है जिने में…’ सारख्या शेरोशायरीचाही वापर केला.
-
“हे मविआ सरकार स्थापन झाल्याचं अजूनही अनेकांना पचनी पडेना. ठिक आहे असूद्या. हे सरकार खंबीर आहे,” असं मत त्यांनी व्यक्त केलं.
-
3 जानेवारीला पुणे विद्यापीठात सावित्रीबाई फुले यांचा पुतळा बसवण्यात येणार आहे, असंही त्यांनी नमूद केलं.
-
तसेच भिडेंच्या वाड्याचं शाळेचं काय झालं? हे विचारणारे खूप भेटतात, पण त्यांना फुले वाड्यात कधी यावंसं वाटत नाही. अखेर आम्हीच तोही निर्णय घेतलाय. यानुसार भिडे वाड्यात मुलींचीच शाळा सुरू होणार. पुणे मनपाच ही शाळा चालवणार आहे, अशी माहिती भुजबळांनी दिली.
-
या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेससह काँग्रेसचे अनेक नेते आणि पदाधिकारीही हजर होते.

बापरे! कपलचा घरामागे सुरु होता रोमान्स; किस करताच काकांनी पकडलं अन्…VIDEO पाहून मुलींनो सावध व्हा