-
शिवसेना खासदार संजय राऊत यांची कन्या पूर्वशी राऊत यांचा विवाह आज पार पडत आहे.
-
ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार हे पूर्वशी यांच्यासोबत आज लग्नबंधनात अडकत आहेत.
-
याच विवाहसोहळ्यातील काही क्षण समोर आले असून यामध्ये संजय राऊत हे त्यांचे जावई मल्हार यांना हॉलेमध्ये घेऊन जाताना दिसत आहेत.
-
मल्हार हे हॉलच्या प्रवेशद्वाराजवळ आल्यानंतर औक्षण करून त्यांचं स्वागत करण्यात आलं.
-
मल्हार यांचं औक्षण झाल्यानंतर राऊत यांनी आपल्या शेरवानीच्या खिशात हात घातला.
-
राऊत यांनी आपल्या खिशामधून काही नोटा काढल्या.
-
राऊत यांनी या नोटा मल्हार यांच्या डोक्यावरुन ओवाळून टाकल्या.
-
राऊत हे मागील काही दिवसांपासून या लग्नाच्या निमित्ताने वेगवेगळ्या राजकीय नेत्यांच्या भेटी घेत होते. लग्नाची आमंत्रणे करण्यासाठी राऊत या भेटी घेत होते.
-
या लग्नाला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारही उपस्थित होते.
-
शरद पवार हे त्यांच्या पत्नीसहीत लग्नाला हजर होते.
-
लग्न लागण्याच्या मुहूर्तावरच शरद पवार हॉलवर पोहचले.
-
माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेलही या लग्नाला उपस्थित असणाऱ्या बड्या नेत्यांपैकी एक होते.
‘गंगू तारुण्य तुझं बेफाम, गं जसा इश्काहचा ऍटम बाम’ आजीपुढं तरुणाई फिकी पडली; जबरदस्त डान्सचा VIDEO झाला व्हायरल