-
-
लाल बहादुर शास्त्री १९६४ ते १९६६ पर्यंत भारताचे पंतप्रधान होते. त्यांना २ मुलं होती. त्यांची नाव अनिल शास्त्री आणि सुनिल शास्त्री. दोघेही राजकारणात आले, मात्र त्यांना वडिलांप्रमाणे राजकीय यश मिळालं नाही.
-
चंद्रशेखर सिंह भारतातील मोठे नेते होते. ते त्यांच्या क्रांतिकारी विचार आणि रोखठोक स्वभावासाठी ओळखले जातात. चंद्रशेखर १९९० मध्ये जवळपास ११ महिन्यांसाठी पंतप्रधान होते.
-
चंद्रशेखर यांना दोन मुलं होती. त्यांची नावं पंकज शेखर आणि नीरज शेखर अशी होती. नीरज शेखर यांनी वडिलांच्या राजकीय वारसा पुढे नेण्याचा निर्णय घेत राजकारणात प्रवेश केला. मात्र, नीरज आपल्या राजकीय जीवनात खासदार पदाच्या पलिकडे जाऊ शकले नाही.
-
पी. व्ही. नरसिंह राव यांचा समावेश देशाच्या दिग्गज नेत्यांमध्ये होतो. ते १९९१ ते १९९६ पर्यंत ५ वर्ष देशाचे पंतप्रधान होते. ते त्यांच्या खास कार्यशैलीमुळेही चर्चेत होते. नरसिंह राव यांना दोन मुलं होती. रंगा राव आणि राजेश्वर राव या दोघांनीही राजकारणात प्रवेशे केला. यानंतर रंगा राव आमदार, तर राजेश्वर राव खासदार म्हणून निवडून आले. मात्र, त्यांना वडिलांप्रमाणे देशाच्या राजकारणात तसं स्थान मिळवता आलं नाही.
-
विश्वनाथ प्रताप सिंह १९८९ ते १९९० पर्यंत देशाचे पंतप्रधान होते. ते उत्तर प्रदेशसारख्या मोठ्या राज्याचे मुख्यमंत्री देखील झाले. त्यांचा मुलगा अजय प्रताप सिंह देखील राजकारणात आला. मात्र, त्यांना स्वतःची वेगळी ओळख तयार करता आली नाही. सध्या ते सक्रीय राजकारणापासून दूर आहेत.
-
इंद्र कुमार गुजराल देशाचे १२ वे पंतप्रधान होते. ते जवळपास ९ महिने पंतप्रधान होते. ते केंद्रात माहिती आणि प्रसारण मंत्री आणि परराष्ट्र मंत्री देखील राहिले. त्यांचा मुलगा नरेश गुजराल देखील राजकारणात आले. ते शिरोमणी अकाली दलात होते. राज्यसभेतील खासदार नरेश गुजराल यांना देखील वडिलांप्रमाणे मोठ्या पदावर पोहचता आलं नाही.

हनुमानाच्या ‘या’ आहेत चार प्रिय राशी; कमी वयात होतात श्रीमंत, संकटमोचनच्या कृपेने अडचणी होतात दूर