-
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमुल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी राष्ट्रवादीचे दिग्गज नेते उपस्थित होते.
-
राष्ट्रवादीच्या या नेत्यांमध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांपासून अगदी अदिती तटकरेंपर्यंत अनेकजण हजर होते.
-
राष्ट्रवादीचे प्रमुख नेते प्रफुल पटेल आणि ममता बॅनर्जी यांचा पुतण्या अभिजीत बॅनर्जी देखील या बैठकीत हजर होते.
-
राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, रामराजे निंबाळकर, अदिती तटकरे हेही या बैठकीत उपस्थित होते.
-
या भेटीची महाराष्ट्रात चांगलीच चर्चा झाली. इतकंच नाही, तर विरोधी पक्ष भाजपाने देखील या राजकीय भेटीनंतर राष्ट्रवादी आणि आघाडी सरकारवर टीका केली.
५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ