-
लोकसभेतील काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांची खिल्ली उडवली आहे.(PTI)
-
ममता यांना राष्ट्रगीताचा आदर कसा करावा हेच कळत नाही. देशासाठी काहीही करण्यापेक्षा आपल्या पुतण्याची स्तुती करण्यात त्यांना जास्त रस आहे, अशी टीका अधीर रंजन चौधरी यांनी केली आहे.
-
काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे आणि तो वेगवेगळ्या राज्यांतील समस्यांकडे लक्ष देतो, असे अधीर रंजन चौधरी म्हणाले.
-
काँग्रेसकडे २० टक्के लोकप्रिय मते आहेत. तर तृणमूलला केवळ ४ टक्के लोकांचा पाठिंबा आहे, असे चौधरी म्हणाले.
-
या २० टक्के मतांशिवाय तुम्ही मोदींशी लढू शकता का?, असा सवाल अधीर रंजन यांनी विचारले आहे. (PTI)
-
अधीर रंजन चौधरी यांनी ममता बॅनर्जींना मोदींचे इन्फॉर्मर म्हटले आहे. ते म्हणाले की, ममतांना काँग्रेस आणि विरोधकांना फोडून कमकुवत करायचे आहे.
-
दरम्यान, ममता बॅनर्जी सध्या त्यांच्या पक्षाच्या विस्तारात व्यस्त आहेत. यासाठी त्यांनी भाजपापेक्षा काँग्रेसचेच नुकसान केले आहे.
-
देशातील सर्वात जुन्या पक्षाच्या अनेक नेत्यांना त्यांनी आपल्या बाजूने केले आहे. मेघालयमध्ये तृणमूलने १२ आमदार फोडून काँग्रेसची हकालपट्टी केली.
-
काँग्रेस पक्ष बंगालमध्ये निवडणूक लढवू शकतो तर तृणमूल काँग्रेस गोव्यात का लढू शकत नाही असा प्रश्न उपस्थित करुन तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी काँग्रेसमुक्त विरोधी पक्ष उभा करण्याचा प्रयत्न का असा सवाल उपस्थित केला जात आहे.
-
ममता बॅनर्जी यांनी सर्व प्रादेशिक पक्षांना भाजपच्या विरोधात एकत्र येण्याचे आवाहन करत सर्व प्रादेशिक पक्ष एकत्र आल्यास भाजपाचा पराभव करणे सोपे जाईल, असे म्हटले आहे.
-
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सतत देशभर दौरे करत आहेत आणि बिगर-काँग्रेस विरोधी पक्षांच्या भेटी घेऊन स्वतंत्र आघाडी स्थापन करण्याच्या तयारीत आहेत.
-
दिल्ली दौऱ्यातही सोनिया गांधी यांची भेट न घेण्याबाबत प्रश्न विचारला असता, ममता बॅनर्जी यांनी प्रत्येक वेळी त्यांना भेटावे असे घटनेत लिहिले आहे का, असा टोला लगावला होता.
-
२०२४ च्या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांना विरोधी पक्षाचा चेहरा म्हणून पुढे करण्याचा निर्णय तृणमूलने घेतला आहे.
-
ममता देशभरात ज्या राज्यांमध्ये काँग्रेसची संघटना कमकुवत आहे किंवा भाजपाच्या विरोधात उभे राहण्याच्या स्थितीत नाही, अशा राज्यांमध्ये फिरत आहे. (सौजन्य: West Bengal CMO)

Champions Trophy: “हे फारच चुकीचं होतं…”, डेव्हिड मिलरने आफ्रिकेच्या पराभवाचं खापर ICCवर फोडलं, सामन्यानंतर दुबईला जाण्यावरून सुनावलं