-
नोकरदार व्यक्ती म्हटलं की कामासोबतच व्यक्तीगत आयुष्यासाठी सुट्ट्याही तेवढ्याच महत्त्वाच्या असतात.
-
या सुट्ट्यांच्या दिवसांमध्ये नोकरदारांना घरच्यांसोबत वेळ घालवता येतो आणि कामातून काहीसा ब्रेक घेऊन विसावाही घेता येतो.
-
त्यामुळे नोकरदार वर्ग नवीन वर्षासोबतच त्या वर्षातील सार्वजनिक सुट्ट्यांचीही तेवढ्याच आतुरतेने वाट पाहत असतो.
-
महाराष्ट्रातील नोकरदारांची ही वाट पाहणं संपलंय.
-
महाराष्ट्र सरकारने वर्ष २०२२ मधील सार्वजनिक सुट्ट्यांची यादी जाहीर केलीय. याप्रमाणे २०२२ मध्ये एकूण २५ सुट्ट्या आहेत.
-
एकूण २५ सुट्ट्यांपैकी १ एप्रिल २०२२ ची एक सुट्टी ही केवळ केवळ बँकांसाठी असणार आहे. ती सुट्टी बँकांना आपले वार्षिक लेखे पूर्ण करण्यासाठी देण्यात आली आहे.
-
याशिवाय एकूण २ सार्वजनिक सुट्ट्या शनिवारी आणि ६ सुट्ट्या रविवारी आल्या आहेत. त्यामुळे शनिवार आणि रविवार अशा साप्ताहिक सुट्ट्या असणाऱ्यांना या सार्वजनिक सुट्ट्यांचा आनंद आपल्या आठवडी सुट्ट्यांच्या रुपातच घ्यावा लागणार आहे.

IND vs NZ LIVE, Champions Trophy 2025 Final: रोहित शर्माचं फायनलमध्ये झंझावाती अर्धशतक, टीम इंडियाची दणक्यात सुरूवात