-
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यसभेत निलंबित खासदारांवर टीका करताना सावरकराच्या मुद्द्यावर शिवसेनेला लक्ष्य केले होते.
-
संसदेत दंगा करणाऱ्या १२ खासदारांनी माफी मागायला आम्ही काय सावरकर आहोत का? असं म्हटलं. अरे निर्लज्जांनो ज्या सावरकरांनी अंदमानात कोलुचा बैल बनून शिक्षा भोगली त्याच्याबद्दल बोलत आहात,” असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते.
-
सावरकरांवरील चिखलफेकीत शिवसेनेचाही सहभाग होता, असा आरोप फडणवीसांनी केला
-
त्यावर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. वीर सावरकरांच्या विचारांचे खरे वारसदार आम्हीच आहोत असे राऊत यांनी म्हटले आहे.
-
वीर सावरकरांबद्दल आम्हालाच बोलायला पाहिजे. त्यांचे विचारांचे खरे वारसदार आम्हीच आहोत
-
बाळासाहेब ठाकरेंनीच वीर सावकरांचा हिंदुत्वाचा विचार पुढे नेला आहे.
-
आम्ही घाबरट नाही. हिंदुत्वाच्या बाबतीत आम्ही कधीही युटर्न घेतलेला नाही.
-
आजही सावकर आमचे आदर्श आहेत आणि राहणार आहेत, असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.
-
सरकारकडे असे काय कारण आहे की त्यांना सावरकरांना भारतरत्न देता येत नाही. तुम्ही सर्वांना पुरस्कार देत आहात.
-
प्रियंका चतुर्वेदी यांच्यावर जो खोटा आरोप लावला आहे त्यावर कायदेशीर कारवाई होत आहे. आधी मलाही कोणी चुकीचे बोलल्याचे वाटले पण तसे काही झालेले नाही.
-
देवेंद्र फडणवीसांनी सावकरांचा अपमान करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून शिवसेना बसली आहे असे म्हटले आहे. त्यावरही संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली.
-
त्यावर रामविलास पासवान यांनी राम मंदिराबाबत जी वक्तव्ये केली होती, त्यांना मांडीवर घेऊन कोण बसले होते. आमच्या मनातल्या भावना काय आहेत हे पहा, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख