-
इंडोनेशियात भयानक ज्वालामुखीचा उद्रेक झालेला पाहायला मिळाला. (फोटो सौजन्य : रॉयटर)
-
ज्वालामुखीनंतर आतापर्यंत इंडोनेशियात एकूण १३ जणांचा मृत्यू झाला आहे. (फोटो सौजन्य : रॉयटर)
-
याशिवाय जवळपास ७ नागरिक ज्वालामुखी झालेल्या परिसरातून बेपत्ता आहेत. (फोटो सौजन्य : एपी)
-
ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानंतर इंडोनेशियातील पूर्व जावा प्रांतात राखेचं साम्राज्य पाहायला मिळालं. (फोटो सौजन्य : रॉयटर)
-
आकाशात जवळपास १२,००० मीटरपर्यंत (४०,००० फूट) ज्वालामुखीची राख परसली. (फोटो सौजन्य : रॉयटर)
-
गावांवर राखीची चादर पसरलेली दिसत आहे. (फोटो सौजन्य : एपी)
-
यानंतर नागरिकांना या ठिकाणापासून ५ किलोमीटर दूर थांबण्यास सांगितलं आहे. (फोटो सौजन्य : रॉयटर)
-
या परिसरात घरांवर राखेचे थर साचले आहेत. शेतांमध्येही राख साठल्यानं पिकं उद्ध्वस्त झालीत. (फोटो सौजन्य : रॉयटर)
-
अशातच पाऊस पडत असल्याने या परिसरात राखयुक्त चिखलाचं साम्राज्य तयार झालंय. यामुळे नागरिकांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. (फोटो सौजन्य : एपी)

भर रस्त्यात दोन सापांचं मिलन; पण लोकांनी मध्येच काय केलं पाहा, अंगावर काटा आणणारा VIDEO होतोय व्हायरल