-
राष्ट्रपती रामनाथ कोविंद ४ दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत.
-
आज त्यांचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सपत्नीक आगमन झाले.
-
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री अदिती तटकरे, महापौर किशोरी पेडणेकर आदींनी यावेळी त्यांचे स्वागत केले.
-
यावेळी वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील हजर होते.
-
भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे २ दिवसांच्या पुणे दौऱ्यासाठी पुणे विमानतळावर भारतीय वायूसेनेच्या हेलिकॉप्टरने आगमन झाले.
-
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, राजशिष्टाचार राज्यमंत्री आदिती तटकरे, महापौर मुरलीधर मोहोळ यांनी त्यांचे स्वागत केले.
-
महाराष्ट्रातील रायगडावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे स्वागत करण्यात आले.
-
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे देखील उपस्थित होते.
-
राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी आज रायगड किल्ल्याला भेट देऊन छत्रपती शिवाजी महाराजांना आदरांजली वाहिली.
-
तसेच त्यांनी जगदीश्वराचं दर्शन घेतलं आणि शिवरायांच्या समाधीस्थळालाही भेट दिली.
-
राष्ट्रपतींबरोबर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, खासदार संभाजीराजे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
-
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून ऐतिहासिक रायगड किल्ल्याला भेट दिली.
-
राष्ट्रपतींनी यावेळी किल्ल्याच्या जतन व संवर्धन कामाचेही कौतुक केले.
-
त्यांनी किल्ल्याच्या जतन व संवर्धन कामाचा आढावा घेतला
-
राजसदरेवर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले.
-
या वेळी त्यांना भवानी तलवार, दांडपट्टा, आज्ञापत्र आणि शिवकालीन होण याची प्रतिकृती भेट म्हणून देण्यात आली.
-
राष्ट्रपती कोविंद यांच्यासोबत या भेटीच्या वेळी अनेक मान्यवर हजर होते.
-
राष्ट्रपती यांनी या भेटी दरम्यान आपलं मनोगतही व्यक्त केलं.
-
तसेच रायगडावर सुरू करण्यात आलेल्या रोप वे सुविधेचाही अनुभव घेतला.

५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ