-
जावेद वादळानंतर पश्चिम बंगालमध्ये सोमवारी (६ डिसेंबर) तुफान पाऊस आला. यामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालं. अनेक शहरांमध्ये पाणीच पाणी साचलं आहे.
-
अनेक ठिकाणी तुफान पावसाने वाहतुकीवर मोठा परिणाम केलाय. पाण्यात बुडालेल्या रस्त्यावर केवळ एसटी बसेस आणि कार अशी वाहनं वाट काढताना दिसत आहेत.
-
डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वादळानंतरच्या पावसाने प्रवाशांना पाण्यातून मार्ग काढण्याची वेळ आली.
-
कोलकात्यात तर प्रवासी पाण्यातूनच प्रवास करताना दिसले. यावेळी रस्त्यांवर पाणीच पाणी दिसत आहे.
-
अशातच हुगळी नदीतील पाण्याची पातळी वाढल्यानं कोलकाता शहरात पाणी घुसलं आहे. यामुळे शहरातील स्थिती अधिक वाईट झाली.
-
यानंतर पालिका कर्मचाऱ्यांकडून वॉटर पम्पचा वापर करून पुराचं पाणी उचलण्याचा प्रयत्न केला जात आहे.
-
सोमवारी सकाळपासूनच कालिंदी, गौरेश्वर आणि रायामंगल इत्यादी नद्यांना उधाण आलंय. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात पाणीच पाणी झालंय.
-
शहरात परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत, अशी माहिती स्थानिक प्रशासनाने दिली आहे.
![Haldi Ceremony Viral Video](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/New-Project-2025-02-06T184910.118.jpg?w=300&h=200&crop=1)
‘त्याला पाहून ती ढसाढसा रडली…’ तिच्या हळदीचा भावनिक क्षण; काळजाला भिडणारा VIDEO एकदा पाहाच