-
भारतीय सैन्याच्या गोळीबारात सामान्य नागरिकांचा मृत्यू झाल्यानंतर नागालँडमध्ये तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली आहे. (फोटो सौजन्य : एपी)
-
या पीडितांच्या अंत्यसंस्काराला मोठी गर्दी जमा झाली. यावेळी नागरिक आक्रमक झालेले दिसले. (फोटो सौजन्य : एपी)
-
नागालँडमधील ज्या गावात १३ निशस्त्र कामगारांची हत्या झाली त्या ठिकाणी स्थानिकांनी आंदोलन करत त्यांना न्याय देण्याची मागणी केलीय. (फोटो सौजन्य : एक्स्प्रेस, तोरा अगरवाल)
-
गोळीबारात नागरिक मारले गेल्यानंतर स्थानिक नागरिक आक्रम झाले आणि त्यांनी सैन्यावर हल्ला चढवला. यानंतर पुन्हा गोळीबार झाला आणि त्यात आणखी लोक मारले गेले. (फोटो सौजन्य : एक्स्प्रेस, तोरा अगरवाल)
-
या विरोधात अनेक सामाजिक संघटना, राजकीय पक्ष एकत्रित आले असून या घटनेचा निषेध करत आहेत. यात राज्य सरकारचाही समावेश आहे. (फोटो सौजन्य : एक्स्प्रेस)
-
सरकारने देखील आता आफ्स्पा कायदा मागे घेण्याची मागणी केली आहे. (फोटो सौजन्य : एक्स्प्रेस, तोरा अगरवाल)
-
नागालँडच्या सर्वात मोठ्या हॉर्नबिल उत्सवात या घटनेबाबत सहवेदना व्यक्त करत काळा झेंडा फडकावण्यात आला. दरम्यान, सरकारने हा उत्सवच रद्द केला आहे. (फोटो सौजन्य : पीटीआय)
-
स्थानिक नागरिकांमध्ये इतका संताप आहे की त्यांनी सैनिकांच्या छावण्यांना आग लावल्याचे गंभीर प्रकारही घडलेत. संतप्त जमावाने सैनिकांच्या गाड्या देखील जाळल्या आहेत. (फोटो सौजन्य : पीटीआय)

२३ फेब्रुवारी पंचांग: मेष, कन्या राशीचा रविवार जाणार आनंदात; तुमच्या नशिबात कोणत्या मार्गे येणार सुख? वाचा राशिभविष्य