-
तामिळनाडूमधील कुन्नरजवळ झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झालेले भारताचे संरक्षण दलांचे प्रमुख जनरल बिपिन रावत आणि त्यांची पत्नी मधुलिका यांच्यावर दिल्लीत लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
-
यावेळी देशातील दिग्गज राजकीय नेते उपस्थित होते.
-
याशिवाय नेपाळ, भुतान, बांगलादेश, श्रीलंकाचे सैन्य दल प्रमुखांनी उपस्थिती लावली.
-
देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी देखील सीडीएस जनरल बिपिन रावत यांचं दर्शन घेत त्याला सलाम केला.
-
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी, काँग्रेस खासदार मल्लिकार्जून खरगे, हरीश रावत, भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि डीएमकेचे नेते ए. राजा आणि कनिमोई हे देखील या ठिकाणी उपस्थित होते.
-
जनरल रावत यांच्या दोन मुली कृतिका आणि तारिणी या दोघींनी आई-वडिलांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला.
-
मुखाग्नी देताना दोघीही मुली भावूक झालेल्या दिसल्या.
-
भारतीय सैन्याने जनरल रावत यांना १७ तोफांची सलामी दिली.
-
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजीत डोभाल आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देखील जनरल रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका यांना आदरांजली वाहिली.
-
यावेळी जनरल रावत यांच्या नातवांनीही अंत्यदर्शन घेत आदरांजली वाहिली.
-
जनरल सावत यांच्या नातेवाईकांनाही अंत्यसंसस्काराच्या वेळी दुःख अनावर झालं.
-
विशेष म्हणजे तिन्ही संरक्षण दलांचे प्रमुख बिपिन रावत यांच्यासह हेलिकॉप्टर अपघातात आपले प्राण गमावलेल्या सर्वांना जम्मू काश्मिरमधील नागरिकांनीही आदरांजली वाहिली.
-
यावेळी श्रीनगरमध्ये मोठ्या प्रमाणावर नागरिक हातात मेणबत्ती घेत रस्त्यावर आले.

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”