-
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा आज ८१ वा वाढदिवस आहे. राज्याच्या राजकारणातील मोठं नाव असणाऱ्या शरद पवारांचा राजकीय वारसा त्यांची मुलगी सुप्रिया सुळे पुढे चालवत आहेत. सुप्रिया सुळे शरद पवारांच्या एकुलत्या एक मुलगी आहेत.
-
शऱद पवारांनी दूरदर्शनला दिलेल्या एका जुन्या मुलाखतीत फक्त एकच मुलगी असण्यासंबंधी विचारण्यात आलं होतं. यावर त्यांनी यामागे काय कारण आहे ते सांगितलं होतं. ते उत्तर ऐकून तुम्हालाही अभिमान वाटल्याशिवाय राहणार नाही.
-
मुलगा हवाच याचा हट्ट असताना तुम्हाला एकच मुलगी कशी काय? असा प्रश्न तुम्हाला लोक विचारत असतील. त्याचं समाधान तुम्ही कसं करता असा प्रश्न शरद पवारांना विचारण्यात आला होता. (सौजन्य – दूरदर्शन)
-
यावर शरद पवारांनी उत्तर देताना सांगितलं होतं की, “या प्रश्नाला मला अनेकदा उत्तर द्यावं लागतं. खेड्यापाड्यात गेल्यानंतर लोक मुलगा असता तर बरं झालं असं म्हणतात. शेवटी नाव चालवायला घरात कोणीतरी पाहिजे किंवा बरं वाईट झालं तर अग्नी देण्यासाठी पाहिजे”. (सौजन्य – दूरदर्शन)
-
मुलानेच अग्नी दिला तर स्वर्गाचा रस्ता खुला होतो असंही अनेकजण शरद पवारांना सांगायचे.
-
“पण हा प्रत्येकाचा पहायचा दृष्टीकोन आहे. मला असं वाटतं अग्नी देण्यासाठी कोण असणार याची चिंता करायची की जिवंत असताना नीट नेटकं वागणाऱ्याची चिंता करायची,” असं शरद पवार म्हणतात. (सौजन्य – पीटीआय)
-
मुलगा आणि मुलीकडे पाहण्याचा भारतीय समाजव्यवस्थेचा जो दृष्टीकोन बदलण्याची गरज शरद पवारांनी व्यक्त केली होती. (सौजन्य – पीटीआय)
-
“मुलीला सुद्धा मुलासारखं वाढवून, समान वागणूक देऊन, आत्मविश्वास वाढवून तिच्याकडून उत्तम प्रकारचं काम करुन घेऊ शकतो. व्यक्तिमत्व फुलवो शकतो याची मला खात्री आहे,” असंही शरद पवार म्हणाले होते.
-
स्त्रीला संधी मिळाली तर ती उत्तम प्रकारचं कर्तृत्व दाखवू शकते असा विश्वास शरद पवारांनी यावेळी बोलून दाखवला.
-
विशेष म्हणजे शरद पवारांनी यावेळी सुप्रिया सुळेंना राजकारणात रस नसून त्यांची येण्याची इच्छाही नसल्याचं म्हटलं होतं. पण कोणत्याही क्षेत्रात संधी मिळाली तर ती कर्तृत्व दाखवू शकते असा विश्वास त्यावेळी व्यक्त केला होता. (सौजन्य – फेसबुक)
-
मुलगी कर्तृत्व दाखवेल असं जर आपल्याला पटत असेल तर मुलाचा हव्यास करण्याची गरज नाही असं शरद पवारांचं म्हणणं आहे.
-
दरम्यान यामागे अजून एक कारण शरद पवारांनी सांगितलं होतं. इतरांना सल्ले देताना, मार्गदर्शन करताना आपणही तसं वागायचा पाहिजे असं त्यांनी म्हटलं होतं. (सौजन्य – फेसबुक)
-
“आम्ही सतत सगळ्या देशाला, महाराष्ट्राला कुटुंब नियोजन करा म्हणून मार्गदर्शन करत राहणार आणि आपल्या घऱात भरपूर गर्दी योग्य दिसणार नाही. कुठेतरी हे थांबलं पाहिजे आणि आपण जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत इतर जणही थांबण्याचा विचार करत नाहीत. त्याचदृष्टीने मुलीवरच समाधान मानण्याची भूमिका मी आणि पत्नीने घेतली,” असा उलगडा शरद पवारांनी केला होता. (सौजन्य – फेसबुक)
-
या मुलाखतीत प्रतिभा पवार यांनीही या प्रश्नाचं उत्तर दिलं होतं. (सौजन्य – दूरदर्शन)
-
त्या म्हणाल्या होत्या की, “एकच मुलगी आहे म्हणून मला कधीच दुख: झालं नाही. मुलगा नाही अशी शंकाही कधी माझ्या मनात आली नाही. आम्ही दोघांनी मिळून हा निर्णय घेतला”. (सौजन्य – फेसबुक)
-
काँग्रेस पक्षाने तेव्हा कुटुंब नियोजनाला सुरुवात केली होती. आमचं कुटुंब फार मोठं असल्याने कोणीतरी कुठे तरी सुरुवात करायची गरज होती त्यामुळे आम्ही तो निर्णय घेतला,” अशी माहितीही त्यांनी दिली होती (सौजन्य – फेसबुक)
‘त्याला पाहून ती ढसाढसा रडली…’ तिच्या हळदीचा भावनिक क्षण; काळजाला भिडणारा VIDEO एकदा पाहाच