-
वर्षापेक्षा अधिक काळ चाललेल्या दिल्ली सीमेवरील शेतकरी आंदोलनाने आपल्या मागण्या मान्य करून घेत घराकडे परतायला सुरुवात केलीय.
-
घरी परतत असताना हे शेतकरी आंदोलनस्थळावरील आपल्या अनेक आठवणी सोबत घेऊन जात आहेत. यात एका झोपडीचाही समावेश आहे.
-
ही झोपडी जेसीबीच्या सहाय्याने ट्रकमध्ये भरून पंजाबला नेण्यात आली.
-
याशिवाय सिंघू सीमेवर आंबेडकर ग्रंथालय सुरू करणाऱ्या गुरदीप आणि इतर अनेक आंदोलकांनी या काळात तयार केलेल्या झोपड्यांचे लाकूड आणि इतर साहित्य आजूबाजूच्या गरीब मजुरांनाही देऊ केले आहे.
-
यातून शेतकऱ्यांनी खऱ्या अर्थाने शेतकरी-कामगार एकता दाखवल्याचं किसान एकता मोर्चाच्या अधिकृत ट्विटर हँडलवर म्हटलं आहे.
-
शेतकऱ्यांनी आंदोलनस्थळ सोडताना या परिसराची साफसफाई करण्याची मोहीमही हाती घेतली. यासाठी १०० हून अधिक स्वयंसेवक आणि २० जेसीबी काम करत आहेत.
-
शेतकऱ्यांनी आंदोलनस्थळ सोडल्यानंतर दिल्ली पोलिसांनी सिंघू सीमेवर लावलेले बॅरिकेट्स आणि सिमेंटच्या भिंती हटवण्यास सुरुवात केलीय. यावर आंदोलक शेतकऱ्यांनी निशाणा साधत पोलिसांनीच रस्ते बंद केल्याचं म्हटलं.
-
किसान मजदूर एकता रुग्णालयाचे संस्थापक असलेल्या लाईफ केअर फाऊंडेशनने सिंघू सीमेवर आंदोलनाच्या काळात मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांना अभिवादन करण्यासाठी मेणबत्ती प्रज्वलित केल्या.
-
या आंदोलनात महिलांचा मोठा सहभाग होता. हे आंदोलन संपल्यानंतर इतर आंदोलकांसह या महिला देखील घराकडे परतत आहेत.
-
आंदोलक घराकडे परतत असताना त्यांच्यावर विमानातून फुलांचा वर्षाव करण्यात आला.
-
यासाठी विशेष विमानाचा वापर करण्यात आला.
-
लहान मुलांनी देखील ठिकठिकाणी हातात झेंडे घेत आंदोलकांचं घरी स्वागत केलं आहे.

त्र्यंबकेश्वर मंदिरातील प्राजक्ता माळीच्या ‘या’ कार्यक्रमाला माजी विश्वस्तांकडून विरोध; म्हणाल्या, “चुकीचा पायंडा…”