-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (१३ डिसेंबर) काशी विश्वनाथ कॉरिडोअरचं लोकार्पण केलं.
-
सुरुवातीला मोदी काशीमध्ये श्री काल भैरव मंदिरात गेले. या ठिकाणी त्यांनी पूजा-अर्चना केली.
-
तसेच काशीवासीयांचा सत्कार स्विकारला.
-
काशीवासीयांनी पंतप्रधान मोदींना एक फोटोफ्रेम भेट केली.
-
यानंतर पंतप्रधान मोदींनी काशी विश्वनाथ धामाच्या लोकार्पणा आधी गंगा नदीत डुबकी मागली आणि सूर्याला अर्द्धय वाहिलं.
-
गंगा नदीत डुबकीनंतर मोदी मंदिर परिसरात आले.
-
या ठिकाणी मोदींनी भक्तांची आणि साधकांची भेट घेतली.
-
यावेळी काशीवासीयांनी मोदींचं पारंपारिक वाद्य वाजवत स्वागत केलं.
-
पंतप्रधान मोदींनी ‘काशी विश्वनाथ मंदिरा’मध्ये पूजा केली.
-
यानंतर त्यांनी काशी विश्वनाथ धाममध्ये जमलेल्या भक्तांवर पुष्प वर्षाव केला.
-
काशीला भव्य स्वरूप देत मोदींनी ‘काशी विश्वनाथ धामाचं’ लोकार्पण केलं.
-
यावेळी मोठ्या प्रमाणात जनसमुदाय हजर होता.

३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख