-
राजकारणात असलेल्या व्यक्तींचं लग्न कायमच चर्चेचा विषय ठरतं. सर्वांनाच या व्यक्तींच्या व्यक्तिगत आयुष्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता असते. त्यामुळेच नुकतेच राजदचे नेते तेजस्वी यादव यांच्या लग्नानंतर त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. इतकेच नाही तर त्यांच्यासोबत इतर राजकीय नेत्यांचे लग्नातील फोटो देखील व्हायरल झाले. यापैकीच काही राजकीय नेत्यांच्या लग्नातील फोटोंचा आढावा.
-
तेजस्वी यादव यांनी ९ डिसेंबरला २०२१ रोजी लग्न केलं.
-
अखिलेश यादव आणि डिंपल यादव यांनी २४ नोव्हेंबर १९९९ रोजी लग्न केले.
-
अखिलेश यादव यांचे पुतणे तेज प्रताप सिंह लोकसभेचे सदस्य म्हणजेच खासदार राहिलेत. त्यांचं लग्न लालू प्रसाद यादव यांची सर्वात लहान मुलगी राजलक्ष्मी यादव यांच्यासोबत २६ फेब्रुवारी २०१५ झालं.
-
माजी केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो ९ नोव्हेंबर २०१६ रोजी पुन्हा एकदा नवरदेव बनले. त्यांनी एअर होस्टेज रचना शर्मा यांच्याशी लग्न केलं.
-
रायबरेलीच्या आमदार अदिती सिंह यांचं लग्न काँग्रेसचे आमदार अंगद सैनी यांच्यासोबत झालं. अंगद पंजाबमधील नवाशहरमधून आमदार आहेत.
-
काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी आतापर्यंत तिनदा लग्न केलं. सुनंदा पुष्कर त्यांची तिसरी पत्नी होती. सुनंदा पुष्कर यांचा मृत्यू झाला आहे.
-
लालू प्रसाद यादव यांचा मोठा मुलगा तेज प्रताप यादव यांनी ऐश्वर्या राय यांच्याशी लग्न केले. मात्र, हे लग्न फार काळ टिकलं नाही. अखेर दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला.

शनि आणि राहूचा होणार महासंयोग! १८ मे आधी या ४ राशींचे लोक होतील श्रीमंत, यशाच्या शिखरापर्यंत पोहचणार