-
रायपूरच्या धर्म संसदेत महात्मा गांधींवर वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या कालीचरण महाराज यांना छत्तीसगड पोलिसांनी मध्य प्रदेशातील खजुराहो येथून अटक केली आहे.
-
खरं तर महात्मा गांधींबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरल्यापासूनच कालीचरण महाराज चर्चेत आले. त्यानंतर हे कालीचरण महाराज कोण आणि कुठले आहेत, याबद्दल चर्चा सुरू झाली.
-
तर, कालीचरण महाराज हे मुळचे महाराष्ट्रातील अकोल्याचे असून त्यांचं खरंं नाव अभिजीत धनंजय सारंग आहे. आता अकोल्याचा अभिजीत सारंग कालीचरण महाराज कसा झाला, हे पाहुयात..
-
कालीचरण महाराज अकोल्यातील जुने शहर भागातील शिवाजीनगर भागातील भावसार पंच बंगल्याजवळ राहतो. त्याच्या आईचं नाव सुमित्रा तर वडिलांचं नाव धनंजय सारंग आहे.
-
शिक्षणाचा कंटाळा आणि त्यात खोडकर स्वभाव असल्याने आठवीपर्यंत शिक्षण घेतलं. आई-वडिलांनी प्रयत्न केले पण काही फायदा झाला नाही.
-
अध्यात्माकडे ओढ असल्याने ८वी पर्यंत शिकल्यानंतर त्याने शाळा सोडली आणि इंदूरला मावशीकडे गेला. तिथे तो भैय्यूजी महाराजांच्या आश्रमात जाऊ लागला. नंतर त्याने दिक्षा घेतली आणि हा अभिजीत सारंग कालीचरण महाराज झाला.
-
एका मुलाखतीत बोलताना कालीचरण महाराजने सांगितलं होतं की, “मला शाळेत जाणं पसंत नव्हतं. शिक्षणात मला कोणताही रस नव्हता. जर मला जबरदस्तीने शाळेत पाठवलं तर मी आजारी पडायचे. सर्वजण माझ्यावर प्रेम करायचे त्यामुळे माझं म्हणणं ऐकायचे. माझी धर्माकडे ओढ असल्याने अध्यात्माकडे वळलो”.
-
कालिभक्त म्हणून त्याने कालिचरण महाराज नाव धारण केलं.
-
आपण कालीमातेला आई तर अगस्ती ऋषींना गुरु मानत असल्याचं तो सांगू लागला.
-
न वर्षांपुर्वी अकोल्यातल्या पुरातन शिवमंदीरात शिवतांडव स्तोत्र म्हटलं आणि व्हिडीओ व्हायरल झाल्याने कालीचरण महाराज प्रसिद्धीझोतात आला.
-
२०१७ मध्ये अकोला महापालिकेच्या निवडणुकीत कालीचरण महाराजला पराभवाचा सामना करावा लागला.
-
कालीचरणचे वडील धनंजय सारंग हे मेडिकलचे दुकान चालवतात.
-
कालीचरण महाराजला मानणारे लोक आहेत.
-
कालीचरण महाराज कार्यक्रम घेऊन प्रवचन देखील करतात.
-
(सर्व फोटो सोशल मीडियावरून साभार)
‘एमपीएससी’च्या इतिहासात पहिल्यांदाच २७९५ जागांसाठी जाहिरात, ‘या’ पदवीधरांना अर्जाची संधी…