-
भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली सध्या बराच चर्चेत आहे, तो म्हणजे त्याच्या एकदिवसीय कर्णधारपदावरून!
-
टी-२० संघाच्या कर्णधारपदावरून स्वत:हून पायउतार झालेल्या विराट कोहलीला बीसीसीआयनं एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरूनही दूर केलं.
-
कर्णधारपद काढून घेण्यापूर्वी आपल्याशी चर्चा केली नाही, असा आरोप विराटनं बीसीसीआयवर केला. शिवाय, टी-२० कर्णधारपद सोडताना आपल्याला कुणीही तसं करू नको, असं सांगितलं नसल्याचंही विराट म्हणाला.
-
विराटच्या या आरोपांमुळे त्याच्या आणि बीसीसीआयमध्ये सारंकाही आलबेल नसल्याचं समोर आलं.
-
बीसीसीआय आणि विराटमधले वाद चव्हाट्यावर आले.
-
बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुली आणि इतर पदाधिकाऱ्यांनी आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर आता खुद्द निवड समिती अध्यक्ष चेतन शर्मा यांनी याबाबत खुलासा केला आहे.
-
विराट कोहलीसोबत नेमकी काय चर्चा झाली होती, त्यावर विराट कोहलीनं काय उत्तर दिलं होतं आणि कर्णधारपदाचा निर्णय कसा घेतला गेला, याविषयी त्यांनी गंभीर दावे केले असून त्यावरून पुन्हा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
-
टी-२० संघाचं कर्णधारपद सोडणं हा पूर्णपणे विराट कोहलीचा निर्णय होता. कुणीही विराटवर त्यासाठी दबाव टाकला नव्हता, असं चेतन शर्मा म्हणाले आहेत.
-
जेव्हा विराटनं टी-२० संघाचं कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतल्याचं आम्हाला सांगितलं, ते ऐकून आम्हाला सगळ्यांनाच धक्का बसला. पण आम्हाला कधीही वाद नको होता.
-
चेतन शर्मा म्हणाले, “जो कुणी त्या मीटिंगसाठी उपस्थित होता, त्या सर्वांनी विराटला टी-२० संघाचं कर्णधारपद सोडण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करायला सांगितलं.
-
वर्ल्डकप जवळ येत होता. त्यामुळे आम्ही विराटला म्हणालो, किमान भारतीय क्रिकेटसाठी तरी निर्णयाचा पुनर्विचार कर.
-
विराट कोहलीच्या टी-२० कर्णधारपदाविषयीची चर्चा टी-२० वर्ल्डकपनंतर व्हायला हवी होती, असं मला प्रामाणिकपणे वाटतं. पण ती आधीच झाली. असं असलं, तरी आम्ही विराट कोहली आणि त्याच्या निर्णयाचा सन्मान करतो, असं चेतन शर्मा म्हणाले.
-
एकदिवसीय संघाचं कर्णधारपद काढून घेण्याबाबत आपल्याशी चर्चा झाली नसल्याचा विराटचा दावा चेतन शर्मांनी खोडून काढला. आमचा निर्णय झाल्यानंतर मी लगेच विराट कोहलीला फोन केला, असं ते म्हणाले.
-
ती कसोटी संघाच्या निवडीसाठीची बैठक होती. आम्हाला त्या मीटिंगमध्ये विराटला याबद्दल सांगायचं नव्हतं. म्हणून मीटिंग संपल्यानंतर मी विराटला फोन करून सांगितलं, असं ते म्हणाले.
-
बीसीसीआय, निवड समिती आणि खेळाडूंमध्ये कोणताही गैरसमज नाही. जेव्हा निवड समितीचा निर्णय होतो, तेव्हा तुम्ही थेट कर्णधारालाच तो सांगू शकता. आमचा निर्णय होताच आम्ही विराटला सांगितल्याचंही चेतन शर्मांनी नमूद केलं.
-
एकदिवसीय संघासाठीही नव्या कर्णधाराची निवड करण्याचा निर्णय निवड समितीचा होता. मी एकटा कोणताही निर्णय घेऊ शकत नाही, असं चेतन शर्मा म्हणाले.
-
विराट कोहलीनं टी-२० संघाचं कर्णधारपद सोडल्यानंतर निवड समितीला विचार करावा लागला. आम्हाला वाटत होतं की पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेट प्रकारासाठी (एकदिवसीय आणि टी-२०) एकच कर्णधार असावा.
-
दोन्ही प्रकारांसाठी एकच कर्णधार असल्यामुळे निवड समितीला इतर गोष्टींचं नियोजन करणं सोपं होतं. आम्ही त्याला याबाबत माहिती देखील दिली. आमचं फार चांगलं संभाषण झालं – चेतन शर्मा
-
“विराट कोहली भारतीय क्रिकेटसाठी महत्त्वाचा खेळाडू असल्याचं चेतन शर्मा म्हणाले. आमची इच्छा आहे की त्यानं भारतासाठी खेळत राहावं आणि धावा करत राहावं”.
-
“आम्हाला फक्त टी-२० आणि एकदिवसीय संघासाठी एकच कर्णधार हवा होता. हा एक कठीण निर्णय होता, पण निवड समितीला असे कठीण निर्णय घ्यावे लागतात, असंही चेतन शर्मा म्हणाले.
-
पत्रकार परिषदेमध्ये विराट कोहलीनं अनेक खळबळजनक खुलासे केले असून त्यावरून वाद सुरू झाला आहे. त्यात सर्वात पहिला दावा म्हणजे बीसीसीआयनं कर्णधारपद सोडू नकोस वगैरे सांगितलंच नाही!
-
हा निर्णय बीसीसीआय आणि निवड समितीने मिळून घेतला होता. खरे तर बीसीसीआयने विराटला टी-२० चे कर्णधारपद सोडू नये अशी विनंती केली होती, पण त्याला ते मान्य नव्हते, असं गांगुली म्हणाला होता.
-
दोन भिन्न लोक मर्यादित षटकांच्या दोन्ही फॉरमॅटमध्ये संघाचे नेतृत्व करावेत, असे निवड समितीला वाटत नव्हते”, असं गांगुलीनं म्हटलं होतं.
-
मी टी २०चे कर्णधारपद सोडू नये असे बोर्डाने कधीच म्हटले नाही असा खुलासा विराटने केला आहे. मी टी-२० कर्णधारपद सोडण्यापूर्वी बोर्डाशी बोललो होतो. बोर्डानेही माझ्या म्हणण्याशी सहमती दर्शवली. मी टी-२० चे कर्णधारपद सोडू नये, असे बोर्डाने कधीच म्हटले नाही,” असे विराट म्हणाला.
-
“एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदाविषयी माझं बीसीसीआयशी काहीच बोलणं झालेलं नव्हतं. मला फक्त विश्रांती हवी होती. निवड समितीच्या बैठकीच्या दीड तास आधी मला संपर्क करण्यात आला. त्याआधी यावर काहीही चर्चा झालेली नव्हती”, असं विराटनं सांगितलं.
-
फक्त एका ओळीत कर्णधारपद काढल्याचं सांगितल्यातंही विराटनं सांगितलं होतं.
-
निवड समितीच्या प्रमुखांनी माझ्यासोबत कसोटी संघाविषयी चर्चा केली. आणि तो फोन कॉल संपवताना निवड समितीच्या पाचही सदस्यांनी मला सांगितलं की तू आता एकदिवसीय संघाचा कर्णधार नसशील”, असं विराट कोहली म्हणाला.
-
आता विराट कोहलीकडून एकदिवसीय संघाचं कर्णधारपद काढून ते रोहीत शर्माकडे देण्यात आलं आहे.
-
टी-२० संघाचं कर्णधारपद विराट कोहलीनं सोडल्यानंतर ते याआधीच रोहीत शर्माकडे दिलं आहे.
-
टी-२० आणि एकदिवसीय संघाचं कर्णधारपद गेल्यानंतर विराट कोहलीकडे सध्या फक्त कसोटी संघाचं कर्णधारपद आहे.
-
बीसीसीआयकडून या मुद्द्यावर जे काही सांगायचं, ते संगून झाल्याचं नंतर सौरव गांगुलीनं स्पष्ट केलं.
-
एकदिवसीय संघाचं कर्णधारपद काढून घेतल्यानंतर सध्या सुरू असलेली दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका ही विराट कोहलीची पहिलीच कसोटी मालिका आहे.
-
सेंच्युरियन मैदानावर पहिल्यांदाच दक्षिण आफ्रिकेला पराभूत करणाऱ्या भारतीय संघाचं नेतृत्व विराट कोहलीकडे होतं.
-
विराट कोहली आणि रोहीत शर्मा यांच्यातही मतभेद असल्याच्या चर्चा मध्यंतरी सुरू होत्या.
-
आपल्यात आणि रोहीत शर्मामध्ये कोणतेही मतभेत नसून आता मी हे सांगून सांगून थकलो आहे, असं विराट कोहलीनं स्पष्ट केलं आहे.

लोकांच्या जीवाशी खेळ! कलिंगड विकत घेताना आता १०० वेळा विचार कराल; VIDEO पाहून तर झोप उडेल