-
पिंपरी-चिंचवड शहरातील झोपड्यांचं रुपडं पालटण्याची एक विशेष मोहिम सध्या हाती घेण्यात आलीय. (सर्व फोटो: कृष्णा पांचाळ, लोकसत्ता डॉट कॉम प्रतिनिधी)
-
शहरात तशा शेकडो झोपडपट्ट्या आहेत मात्र अनेक ठिकाणी मुख्य रस्त्याच्या कडेला देखील या झोपडपट्ट्या असल्याने रस्ते विद्रुप दिसतात. त्यामुळेच महानगर पालिकेमार्फत मुख्य रस्त्याच्या कडेला असणाऱ्या झोपडपट्ट्यांवर रंगरंगोटी केली जात आहे.
-
या रंगरंगोटीची पहिली झलक समोर आली असून नव्याने कलाकुसर केल्याप्रमाणे रंग दिल्याने झोपडपट्ट्यांना एकदम फ्रेश लूक आलाय.
-
पिंपरी-चिंचवड शहरातील रस्त्याच्या कडेला असणाऱ्या झोपडपट्ट्यांमुळे शहर विद्रूप दिसत असल्याच्या निरक्षणानंतर रंगरंगोटीचा हा निर्णय घेण्यात आलाय.
-
शहर सुधार समितीच्या सभापती अनुराधा गोरखे यांनी महानगर पालिका आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे रस्त्याच्याकडेला असणाऱ्या झोपडपट्ट्यावर रंगरंगोटी करून सुशोभीकरण करावे अशी मागणी केली होती.
-
काही घरांना पहिल्या टप्प्यात बेसिक रंगरंगोटी करण्यात आली असून लवकर त्यावरही नक्षीकाम आणि कलाकुसर केली जाणार आहे.
-
या मागणीला आयुक्त राजेश पाटील यांनी प्रायोगिक तत्वावर मान्यता दिल्यानंतर रंगकामाला सुरुवात करण्यात आली आहे.
-
त्यानुसार, वेड्यावाकड्या दिसणाऱ्या झोपडपट्टीवर रंगरंगोटी करण्यात येत आहे. त्यामुळे या झोपड्या आर्षिक दिसू लागल्यात.
-
सध्या शहरातील आण्णासाहेब मगर नगर झोपडपट्टीच्या दर्शनी भागावर प्रायोगिक तत्वावर सुशोभिकरण केलं जात आहे.
-
मगर नगर येथील समोरील भाग रंगरंगोटी केल्याने अत्यंत सुंदर आकर्षक दिसत आहे.
-
दरम्यान, काही झोपडपट्ट्याची रंगरंगोटी करून झाल्यास त्यानंतर हा उपक्रम शहरभर राबवायचा की नाही यावर आयुक्त राजेश पाटील निर्णय घेणार आहेत, अशी माहिती अमित गोरखे यांनी दिली आहे.
-
आता हा प्रयोग किती यशस्वी ठरतो हे येणारा काळच सांगेल. पण सध्या केलेल्या या रंगरंगोटीमुळे झोपट्यांना एकदम फ्रेश लूक आलाय हे मात्र खरं. (सर्व फोटो: कृष्णा पांचाळ, लोकसत्ता डॉट कॉम प्रतिनिधी)

२१ फेब्रुवारी राशिभविष्य: अनुराधा नक्षत्रात हातातील कामांना मिळेल यश तर कोणाला लाभेल जोडीदाराचा सहवास; वाचा तुमचा शुक्रवार कसा जाणार