-
नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय विमानतळ होत असल्याने अतिजलद प्रवासासाठी प्रयत्न सुरू आहेत.
-
शिवडी नाव्हाशेवा सागरी मार्गाचे काम वेगाने सुरू असून जलवाहतूक हा दुसरा महत्त्वाचा मार्ग सुरू करण्यात येणार आहे.
-
मुंबई ते बेलापूर ही बोटसेवा सुरू करण्याची सर्व तयारी झाली असून लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या सेवेचा शुभारंभ करण्यात येणार आहे.
-
बेलापूर ते मुंबई असा हा जलवाहतूक मार्ग असून यासाठी महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाकडून जेट्टीचे कामही पूर्ण झाले आहे.
-
ही बोटसेवा लवकरच प्रवाशांसाठी सुरू होणार असून यामुळे नवी मुंबई ते मुंबई हा प्रवास ४५ मिनिटांत शक्य होणार आहे.
-
यासाठी अत्याधुनिक व सुसज्ज अशी बोट देण्यात येणार असून ६० प्रवासी एकावेळी प्रवास करू शकणार आहेत.
-
मुंबई पोर्ट ट्रस्टकडून तिकीट दर निश्चित करण्यात आले नसले तरी अंदाजे ३०० रुपये असण्याची शक्यता आहे.
-
यातून आरामात प्रवास करता येणार असून रस्ते वाहतुकीत टॅक्सीसाठी आकारण्यात येत असलेल्या दरापेक्षा दर कमी असतील.
-
(सर्व फोटो : गणेश शिर्सेकर, इंडियन एक्सप्रेस)

Mahashivratri 2025 Wishes : “हर हर महादेव!”, प्रियजनांना पाठवा महाशिवरात्रीच्या खास मराठमोळ्या अन् हटके शुभेच्छा, पाहा एकापेक्षा एक सुंदर संदेश