-
स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष आणि प्रजासत्ताक दिन असा दुहेरी योग साधून पुण्याच्या शीतल महाजन यांनी पारंपारिक नऊवारी साडी परिधान करून पॅराजम्पिंग करत राष्ट्रीय विक्रम केला.
-
अशाप्रकारे नऊवारी साडी परिधान करून पॅराजम्प करणाऱ्या शीतल पहिल्या भारतीय महिला ठरल्या आहेत.
-
हडपसर येथील ग्लायिडग सेंटर येथे पॅरामोटरच्या साहाय्याने पाच हजार फुटांवरून त्यांनी पॅराजम्पिंग केले.
-
शीतल महाजन या सर्वसामान्य कुटुंबातील आहेत. त्यांनी स्कायडायव्हिंग खेळाचे प्रशिक्षण घेतले आहे.
-
आंतरराष्ट्रीय स्तरावरील वेगवेगळ्या स्पर्धेत त्यांनी सहभाग घेतलेला आहे. आतापर्यंत त्यांच्या नावावर १८ राष्ट्रीय आणि सहा जागतिक विक्रम केल्याची नोंद आहे.
-
जगातील सात खंडात स्कायडायव्हिंग करणाऱ्या शीतल या पहिल्या भारतीय महिला आहेत. त्यांना २०११ साली पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
-
शीतल यांच्या पराक्रमाची दाखल घेत फेडरेशन ऑफ एरोनॉटिकल इंटरनॅशनल यांनी त्यांना सबिहा गोकसेन सुवर्ण पदक देऊन सन्मानित केलं आहे. एरो स्पोर्ट्समध्ये भारतासाठी हे पदक मिळवणाऱ्या त्या पहिली भारतीय महिला ठरल्या आहेत.
-
रॉन मेनेज यांच्या पॅरामोटारमधून जमिनीपासून आकाशात सहा हजार फुटांवर जाऊन नंतर पॅरामोटारमधून बाहेर पडत शीतल यांनी आकाशात पक्ष्यासारखी झेप घेतली. जमिनीच्या दिशेने वेगात येत असतानाच साडेतीन हजार फूट उंचीवर त्यांनी पॅराशूट उघडले. या उपक्रमासाठी शीतल यांना ग्लायिडग सेंटरचे अधिकारी शैलेश चारभे यांचे विशेष सहकार्य लाभल्याचं त्या सांगतात.
-
“आतापर्यंत साडी घालून मी भारताबाहेर अनेक ठिकाणी स्कायडायव्हिंग केले. परंतु, जन्मभूमी असलेल्या पुणे शहरात नऊवारी साडी घालून पॅरामोटारमधून पॅराजम्पिंग केल्याने ही पॅराजम्प माझ्यासाठी अविस्मरणीय ठरली आहे.”, अशी भावना शीतल महाजन यांनी व्यक्त केली.
-
१७ सप्टेंबर २०१८ रोजी शीतल यांनी दहा हजार फूट उंचीवरून पॅराजम्पिंग करत पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या.
-
शीतल यांनी २०२१ मध्ये इजिप्त या देशात पॅराजम्पिंग केले होते. यावेळी त्यांनी तेथील पारंपरिक पेहराव केला होता.
-
इजिप्तमधील गिझा शहरातील पुरातन असणाऱ्या पिरॅमिड्स येथून त्यांनी हे पॅराजम्पिंग केले होते.

४ मार्च राशिभविष्य: सूर्याचा पूर्वा भाद्रपद नक्षत्रात प्रवेश ‘या’ राशींचे पालटणार नशीब; धनलाभासह आयुष्य बदलण्याची मिळेल संधी