-
शनिवारी (२९ जानेवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी बिटिंग रिट्रिट समारंभासाठी आले.
-
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेत स्वागत केलं.
-
या समारंभाला राष्ट्रपती आणि पंतप्रधानांसोबतच संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, लष्करप्रमुख मनोज नरवणे, नौदल प्रमुख आर. हरी कुमार, वायूदल प्रमुख व्ही. आर. चौधरी आणि इतर मान्यवर देखील उपस्थित होते.
-
सैन्यातील ही परेडची परंपरा इंग्लंडमध्ये १७ व्या शतकात दुसरा जेम्स राजाच्या काळात सुरू झाली. तेव्हा राजा जेम्सने युद्धाचा शेवटचा दिवस म्हणून आपल्या सैन्याला अशाप्रकारे परेडचे आदेश दिले होते.
-
बिटिंग रिट्रिट समारंभ प्रजासत्ताक दिनाचा शेवटचा कार्यक्रम असतो. हा उत्सव पंतप्रधान मोदींच्या हस्ते २३ जानेवारी रोजी सुभाषचंद्र बोस यांच्या होलोग्रामचं उद्घाटन करून सुरू झाला होता.
-
स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच बिटिंग रिट्रिट समारंभात महात्मा गांधी यांच्या आवडीची ‘अबाईड विथ मी’ ही धून वाजवली गेली नाही.
-
यंदाच्या समारंभात अबाईड विथ मी ऐवजी ये मेरे वतन के लोगो या लोकप्रिय गाण्याची धून वाजवण्यात आली.
-
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात भारतीय धून वाजवण्याला प्राधान्य देत केंद्र सरकारने अबाईड विथ मीचा यंदा समावेश केला नाही.
-
यंदाच्या या समारंभाची संकल्पना, रचना आणि एकूणच कार्यक्रमांची ‘निवड मेक इन’ इंडियाच्या धर्तीवर करण्यात आली होती.
-
भारताच्या तिन्ही दलांच्या परेड आणि त्यांच्या बँड पथकांच्या लयबद्ध कवायतींनी बिटिंग रिट्रिट समारंभाची शान वाढवली.
-
यंदा बिटिंग रिट्रिट समारंभात लेझर शोचंही खास आयोजन केलं होतं. त्याने अनेकांचं लक्ष्य वेधून घेतलं.
-
या समारंभात आकाशात ड्रोनच्या कसरती आणि तंत्रज्ञानाचा वापर करून बनवलेले विशिष्ट आकार हेही आकर्षणाचा केंद्र राहिलं.
-
ड्रोनने लेझरचा वापर करून अवकाशात गांधींपासून तिरंग्यापर्यंत अनेक आकार तयार केले.
-
यासाठी भारतीय बनावटीचे जवळपास १००० ड्रोन वापरण्यात आले.
-
प्रजासत्ताक दिनानिमित्त राजधानी दिल्लीत आयोजित बिटिंग रिट्रिट समारंभातील खास क्षण
-
प्रजासत्ताक दिनानिमित्त राजधानी दिल्लीत आयोजित बिटिंग रिट्रिट समारंभातील खास क्षण
-
प्रजासत्ताक दिनानिमित्त राजधानी दिल्लीत आयोजित बिटिंग रिट्रिट समारंभातील खास क्षण
-
प्रजासत्ताक दिनानिमित्त राजधानी दिल्लीत आयोजित बिटिंग रिट्रिट समारंभातील खास क्षण
-
प्रजासत्ताक दिनानिमित्त राजधानी दिल्लीत आयोजित बिटिंग रिट्रिट समारंभातील खास क्षण ( सर्व फोटो सौजन्य – Express photo by Tashi Tobgyal)

Thirsty Cheetahs Viral Video : तहानलेल्या चित्त्यांना पाणी पाजणं भोवलं! Video व्हायरल होताच वन विभागाचा चालक निलंबित