-
कर्नाटकातला महाविद्यालयातील हिजाब बंदीचा वाद आता चांगलाच चिघळला आहे.
-
या वादाचे पडसाद देशभरात उमटू लागले आहेत.
-
कर्नाटकातल्या भाजपा सरकारच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पुण्यात आंदोलन करण्यात आलं.
-
या आंदोलनात मुस्लीम महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
-
कर्नाटकातल्या या हिजाब बंदीच्या प्रकाराविरोधात तसंच त्या राज्यातल्या भाजप सरकारचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने महात्मा फुलेवाडा येथे निषेध आंदोलन करण्यात आलं.
-
या आंदोलनात केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजीही करण्यात आली.
-
राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं.
-
यावेळी फुलेवाडा इथल्या सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुलेंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
-
हिजाब प्रकरणावरून आंदोलन होण्याची परिस्थिती पाहाता राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी महाराष्ट्रातील नागरिक आणि राजकीय पक्षांना देखील तंबी दिली आहे.
-
(सर्व फोटो : आशिष काळे, इंडियन एक्सप्रेस)

उन्हाळ्यात कलिंगड खाण्यापूर्वी हा व्हिडिओ पाहा! रंगाचे इंजेक्शन दिलेले कलिंगड कसे ओळखावे? काकुंनी सांगितला सोपा जुगाड