-
पंजाबमध्ये लवकरच विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकात सर्वात जास्त चर्चा झाली ती नवज्योत सिंग सिद्धू यांची.
-
पंजाब काँग्रेसचे प्रमुख नवज्योत सिंग सिद्धू अमृतसर पूर्व मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.
-
या पार्श्वभूमीवर त्यांची मुलगी राबिया सिद्धू ही तिच्या वडिलांच्या प्रचारामध्ये व्यस्त आहे.
-
प्रचारादरम्यान पत्रकारांशी बोलताना राबिया सिद्धूने सांगितले की, जोपर्यंत तिचे वडील जिंकणार नाहीत. तोपर्यंत ती लग्न करणार नाही.
-
तर तिच्या वक्तव्यामुळे चर्चेत असलेल्या राबिया सिद्धूबद्दल काही गोष्टी जाणून घ्या.
-
राबिया सिद्धू सोशल मीडिया स्टार आहे. इन्स्टाग्रामवर तिचे ६७ हजार फॉलोअर्स आहेत.
-
राबियाची सोशल मीडिया प्रोफाइल पाहिल्यास ती खूप बोल्ड आणि ग्लॅमरस आहे.
-
राबिया फॅशनच्या बाबतीत बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षा कमी नाही.
-
राबियाचे फोटो पाहिल्यानंतर तिला फॅशनिस्टा म्हणणे चुकीचे ठरणार नाही.
-
राबिया अनेकदा तिच्या आई-वडिलांसोबत दिसते. ती पारंपारिक आणि वेस्टर्न दोन्ही लूकमध्ये छान दिसते.
-
राबियाने विना मेकअपचे देखील अनेक फोटो शेअर केले आहेत.
-
राबिया तिच्या आई-वडिलांसोबतचे फोटोही इन्स्टावर शेअर करत असते. तिच्या पोस्ट पाहिल्यास ती तिच्या वडिलांच्या खूप जवळ असल्याचे दिसून येते.
-
राबियाला करण सिद्धू नावाचा एक भाऊही आहे. दोन भावंडांमध्ये खूप छान नातं आहे.
-
राबियाच्या करिअरबद्दल सांगायचे झाल्यास तिला फॅशन क्षेत्रात खूप रस असून ती फॅशन डिझायनर आहे.
-
राबियाचे शालेय शिक्षण पंजाब आणि गुरुग्राममध्ये झाले. पंजाबमधील पटियाला येथील यादविंद्र पब्लिक स्कूलमध्ये तिचे शिक्षण झाले. त्यानंतर गुरुग्रामच्या पाथवेज वर्ल्ड स्कूलमधून तिने पुढील शिक्षण पूर्ण केले.
-
राबियाने प्रथम सिंगापूरच्या LASALLE कॉलेज ऑफ आर्ट्समधून फॅशन डिझायनिंगचे शिक्षण घेतले. यानंतर राबियाने लंडनच्या istituto marangoni येथून फॅशन डिझायनिंगमध्ये मास्टर्स डिग्री घेतली.
-
सध्या राबिया तिच्या वडिलांसाठी प्रचार करण्यात व्यस्त आहे.
-
(फोटो – इन्स्टाग्राम)

पुणे पोलिसांकडून अचानक नाकाबंदी; तीन हजार वाहनचालकांची तपासणी; ७२ वाहने जप्त