-
राज्यात करोनाबाधितांची संख्या हळूहळू कमी होत असताना करोनाच्या निर्बंधांमध्ये काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे.
-
यासोबतच आता मास्क सक्तीपासून मुक्ती मिळणार असल्याचं बोललं जाऊ लागलं आहे.
-
मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्कचा वापर थांबवण्यासंबंधी चर्चा झाल्याचंही बोललं जात होतं. दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना यासंबंधी भाष्य केलं आहे.
-
जो पर्यंत करोना पूर्णपणे हद्दपार होत नाही तो पर्यंत मास्कला विसरायचं नाही, असे अजित पवार म्हणाले.
-
मास्कला सोबत घेऊनच आपल्याला काम करायचे आहे. करोना पूर्णपणे हद्दपार झाला तरी काही जण मास्क लावतील.
-
करोना नसतानाही जपानमध्ये लोक मास्क लावूनच फिरतात, असेही अजित पवार म्हणाले.
-
मास्क लावल्यापासून एखाद्याचे सर्दी, खोकला सारखे आजार बरे झाल्याचे वाटत असेल तर तो कदाचित लावेल असेही अजित पवार म्हणाले. (फोटो सौजन्य : Twitter/AjitPawarSpeaks वरुन साभार)
-
याआधी मास्कमुक्तीसंबंधी विचारलं असता, मंत्रिमंडळात मास्कपासून मुक्ती मिळणार असल्याची कोणतीही चर्चा झालेली नाही, असे अजित पवार म्हणाले.
-
जोपर्यंत करोना जात नाही तोपर्यंत मास्क लावावाच लागेल असं मी याआधीही सांगितलं आहे.
-
आमची जेव्हा कधी मंत्रिमंडळ बैठक होते तेव्हा काही चॅनेल अशा बातम्या चालवतात. अशा काही बातम्या चालवू नका. ज्यावेळी मास्क काढण्याची वेळ येईल तेव्हा आम्ही पत्रकार परिषद घेऊन सांगू. तोपर्यंत मास्क ठेवायचा म्हणजे ठेवायचा, असे अजित पवारांनी सांगितले.
-
सभागृहाची दोन हजार लोकांची क्षमता असेल तर एक हजार लोकांना परवानगी मिळत नाही. फक्त दोनशे लोकांनाच परवानगी आहे. त्यामुळे या निर्बंधात शिथिलता आणण्याचा प्रयत्न सुरू आहे.
-
दरम्यान, हळूहळू सर्व नियम हटवण्याची गरज आहे, असेही अजित पवार यांनी म्हटले.

५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ