-
सामाजिक जाणिवेचे दानशूर उद्योगपती आणि बजाज उद्योगसमूहाचे सर्वेसर्वा राहुलकुमार बजाज यांना रविवारी साश्रुनयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला.
-
वैकुंठ स्मशानभूमीमध्ये बजाज यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले तेव्हा आपला भाग्यविधाता आता भेटणार नाही या जाणिवेतून कामगारांच्या डोळ्यांतून नकळतपणे अश्रू झरले.
-
बजाज यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना हृदयविकाराच्या झटक्याने शनिवारी त्यांचे निधन झाले.
-
आकुर्डी येथील बजाज ऑटो कंपनीच्या प्रांगणात असलेल्या निवासस्थानी रविवारी सकाळी बजाज यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते.
-
उद्योग क्षेत्रातील प्रतिष्ठितांसह राजकीय नेते आणि बजाज ऑटोमध्ये काम करणाऱ्या आजी-माजी कर्मचाऱ्यांनी बजाज यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. दुपारनंतर त्यांचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमी येथे आणण्यात आले.
-
राज्य शासनाच्या वतीने गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि पुणेकरांच्या वतीने महापौर मुरलीधर मोहोळ यांनी राहुलकुमार बजाज यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण केले.
-
पोलीस दलाच्या वतीने बंदुकीच्या तीन फैरी झाडून बजाज यांना मानवंदना देण्यात आली.
-
त्यानंतर बजाज यांच्या पार्थिवावरील तिरंगा ध्वज राजीव बजाज यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
-
बजाज यांचे पुत्र राजीव व संजीव बजाज, कन्या, सुनयना केजरीवाल यांच्यासह बजाज परिवारातील सदस्यांनी अंत्यदर्शन घेतले.

मासिक पाळी आलेल्या विद्यार्थीनीबरोबर शाळेचं क्रूर कृत्य, आईने व्हिडिओ रेकॉर्ड केल्यामुळे सत्य आलं समोर; चौकशीचे आदेश