-
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर खोपोलीजवळ बोरघाटात आज (मंगळवार १५ फेब्रवारी २०२२) भीषण अपघात झालाय.
-
या भीषण अपघातात दोन मोठ्या गाड्यांमध्ये एक कार आल्याने कारचा चुराडा झाला.
-
या अपघातामध्ये चार जण जागीच ठार झाले असून तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर एम. जी. एम. रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
-
दोन ट्रेलरच्यामध्ये स्वीफ्ट गाडी पूर्णपणे चिरडली गेली आणि गाडीतील चौघांचा दूर्देवी अंत झाला.
-
मिळालेल्या माहितीनुसार, आज (१५ फेब्रवारी २०२२) सकाळी साडेसहाच्या सुमारास मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर हा अपघात झालाय.
-
एका ट्रेलरचा ब्रेक फेल झाल्याने सहा वाहने एकमेकांना धडकली. यात ट्रक आणि टेम्पोच्या दरम्यान आल्याने कारचा चुराडा झाला. काहीही चूक नसताना चार तरुणांना या अपघातात प्राण गमावावा लागला.
-
या भीषण अपघातामध्ये दोन मोठ्या वाहनांच्यादरम्यान चिरडल्या गेलेल्या कारमधील चौघेही जागीच ठार झालेत.
-
पाच वाहनांच्या अपघातात कंटेनरने पुढे जाणा-या स्वीफ्ट कारला धडक दिली.
-
स्वीफ्ट कार तिच्या पुढे जणाऱ्या आयशर टेम्पोला मागून धडकली. टेम्पोने तिच्या पुढील वेन्यू कारला जोरदार धडक दिली.
-
या अपघातात स्वीफ्टमधील चारही प्रवासी जागीच ठार झाले तर टेम्पोने धडक दिलेल्या कारमधील तीन प्रवासी किरकोळ जखमी झाले.
-
टेम्पोची धडक बसलेल्या वेन्यू कारने पुढे जाणा-या कंटेनरला जोरदार धडक दिली. मात्र हा कंटेनर पुढे निघून गेला.
-
गौरव खरात (३६), सौरभ तुळसे (३२), सिद्धार्थ राजगुरू (३१) अशी मरण पावलेल्यांची नावं असून एकाची ओळख अद्याप पटलेली नाही.
-
अपघात एवढा भीषण होता की गाडीचे दरवाजे खेचून काढून मृतदेह बाहेर काढावे लागले.
-
महामार्ग पोलीस, डेल्टा फोर्स, देवदूत यंत्रणा अपघातग्रास्तांच्या मदतीसाठी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी तातडीने मदतकार्य सुरु केलं.
-
या तिन्ही संस्थेच्या सदस्यांनी वेगाने मदतकार्य करत अपघातग्रस्त वाहने रस्त्यावरुन बाजूला केली. सध्या या मार्गावरील वाहतूक पुन्हा सुरळीत झाली आहे.

Devendra Fadnavis : ‘मी शिंदेंना सांगणार, कडक समज द्या, अन्यथा…’, संजय गायकवाड यांच्या वक्तव्यावरून फडणवीसांचा मोठा इशारा