-
रशिया आणि युक्रेनमधील वाद चर्चेच्या माध्यमातून मिटवण्यासाठी प्रयत्न सुरु असतानाच मोठी घडामोड समोर आली आहे. (Photo : Reuters)
-
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनसोबत लष्करी कारवाईची घोषणा केली आहे. (Photo : Maxar Technologies via AP)
-
या घोषणेनंतर रशियन सैन्य युक्रेनमध्ये कधीही घुसू शकते. त्याच वेळी, पुतिन यांनी युक्रेनमधील रशियन कारवायांमध्ये हस्तक्षेप करणार्यांचा बदला घेण्याची शपथ घेतली आहे. (Photo : Reuters)
-
युक्रेन आणि रशियामधील युद्ध टाळलं जाऊ शकत नाही असं पुतिन म्हणाले आहेत. (Photo : Reuters)
-
पुतीन यांनी युक्रेनच्या लष्कराला ‘शस्त्रे खाली’ ठेवण्याचे आवाहनही केले आहे. (Photo : Reuters)
-
एका टीव्ही चॅनेलवर बोलताना पुतिन म्हणाले की, युक्रेनकडून येणाऱ्या धमक्यांना प्रतिसाद म्हणून ही कारवाई करण्यात आली आहे. (Photo : Reuters)
-
युक्रेनवर ताबा मिळवण्याचे रशियाचे ध्येय नाही. रक्तपाताची जबाबदारी युक्रेनियन शासनाची आहे. (Photo : AP)
-
पुतिन यांनी अमेरिकेसह युरोपीय देशांना इशारा देत, रशियाच्या कारवाईमध्ये हस्तक्षेप करण्याचा कोणीही प्रयत्न केला तर त्यांनी कधीही पाहिलेले नाही असे परिणाम घडतील असे म्हटले आहे. (Photo : Reuters)
-
एपीच्या वृत्तानुसार, रशियाच्या लष्करी कारवाईचे उद्दिष्ट युक्रेनचे निशस्त्रीकरण करणे आहे. (Photo : AP)
-
शस्त्रे ठेवणारे सर्व युक्रेनियन सैनिक सुरक्षितपणे लढाईच्या क्षेत्रातून बाहेर पडण्यास सक्षम असतील, असे पुतीन यांनी म्हटले. (Photo : Reuters)
-
युक्रेनची राजधानी कीवमध्ये शहर हल्ल्याखाली असल्याचं दर्शवणारे एअर रेड सायरन्स वाजले आहेत. (Photo : AP)
-
रशियाने युक्रेनमध्ये लष्करी कारवाईला सुरुवात केल्याचं वृत्त एएफपीने दिलं आहे. (Photo : Reuters)

Waqf Bill Controversy: “अलविदा नितीश कुमार..”, वक्फ विधेयक मंजूर होताच नितीश कुमारांच्या पक्षात बंडखोरी; नाराज नेत्यांचे राजीनामे