-
रशिया आणि युक्रेनमधील वाद चर्चेच्या माध्यमातून मिटवण्यासाठी प्रयत्न सुरु असतानाच या प्रयत्नांना आज रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी सुरुंग लावत युक्रेनविरुद्ध युद्धाची घोषणा केलीय. यानंतर २५ ठिकाणी रशियाने युक्रेनमध्ये हवाई हल्ले केलेत.
-
युक्रेन आणि रशियामधील युद्ध टाळलं जाऊ शकत नाही असं पुतिन म्हणाले आहेत. पुतिन यांनी रशियाच्या विशेष लष्करी ऑपरेशनला सुरुवात करत असल्याचं सांगितलं असून या लष्करी कारवाईमधून युक्रेनचे असैनिकीकरण करण्याचा प्रयत्न असेल असंही ते म्हणाले आहेत.
-
पुतिन यांनी युद्धाची घोषणा केल्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये युक्रेनची राजधानी कीवमध्ये अनेक ठिकाणी हवाई हल्ले झाले.
-
एकाच वेळी रशियाने अनेक बाजूंनी युक्रेनवर आक्रमण करण्यास सुरुवात केली असून जवळजवळ २५ ठिकाणी हल्ले केले आहेत.
-
या हल्ल्यामुळे सर्वसामान्यांना मोठा फटका बसलाय. रशियाने अनेक शहरांवर हल्ले केल्याचा दावा युक्रेनने केलाय.
-
तर रशियाने मात्र आम्ही केवळ युक्रेनमधील लष्करी तळांवरच हल्ला केलाय असं उत्तर दिलं आहे.
-
पुतिन यांनी हल्ल्याचे आदेश दिल्यानंतर रशियन लष्कारने युक्रेनमध्ये शिरकाव करण्यास सुरुवात केली.
-
मागील अनेक आठवड्यांपासून रशियाचे एक लाखांहून अधिक सैनिक युक्रेनच्या सीमाभागांमध्ये तैनात करण्यात आलेले.
-
आज राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी केलेल्या घोषणेनंतर उत्तर युक्रेनमध्ये रशियन लष्कराने आपले मोहिम सुरु केली.
-
रशियाला लागून असलेल्या युक्रेनच्या सीमा भागांमध्ये अ़नेक ठिकाणी रस्त्यांवर तोफा आणि रणगाडे दिसून आले.
-
शस्त वाहून नेणाऱ्या रशियन लष्कराच्या गाड्यांनी मोठ्या प्रमाणात युक्रेनमध्ये प्रवेश केलाय.
-
एकीकडे रशियन लष्कर युक्रेनमध्ये शिरत असतानाच दुसरीकडे युक्रेनमधील मोठ्या शहरांमधून बाहेर पडण्यासाठी लोकांची धडपड सुरु आहे.
-
या फोटोवरुन तुम्हाला अंदाज येईल की उजवीकडील बाजू ही शहराबाहेर जाणाऱ्या रस्त्यावर लागलेल्या वाहनांच्या रांगांची आहे.
-
अनेक शहरांमध्ये जागोजागी धुराचे लोट हवेत उठतानाचं चित्र दिसत आहे.
-
रशियाकडून जरी नागरी वस्तीमध्ये हल्ले केले जात नसल्याचे दावे होत असले तरी अनेक शहरं धुरामध्ये काळवंडलेली दिसत आहेत.
-
हवाई हल्ल्यांमध्ये युक्रेनच्या लष्करी तळांना लक्ष्य करत असल्याचं रशियाचं म्हणणं असलं तरी यामध्ये मोठ्या प्रमाणात सामान्य नागरिकही जखमी झालेत.
-
युक्रेनमध्ये पहाटेपासूनच अशाप्रकारे जागोजागी आगीचे लोळ उठाताना दिसत होते.
-
दुसरीकडे युक्रेनचे लष्कर सज्ज झालं असून अनेक ठिकाणी अशाप्रकारे युक्रेनचे लष्करी जवान गस्त घालत आहेत.
-
सीमा भागांमध्ये अनेक ठिकाणी रस्त्यावर रणगाडे आणि तोफा दिसत आहेत.
-
बऱ्याच शहरी भागांमध्ये क्षेपणास्त्र आणि बॉम्ब हल्ल्याच्या खुणा दर्शवणारी अशी परिस्थिती दिसतेय.
-
युद्धाच्या भितीने अनेकांनी देशाबाहेर पळ काढण्यासाठी कीव विमानतळ गाठलं आहे. मात्र या ठिकाणी विमानसेवा बंद करण्याचा निर्णय युक्रेन सरकारने घेतल्याने अनेकजण अडकून पडलेत.
-
शहरांमध्येही भितीचं वातावरण असून अनेक ठिकाणी लोकांनी जमीनीखालील मेट्रो स्थानकांमध्ये आश्रय घेतलाय.
-
अनेक शहरांमध्ये एटीएमबाहेर लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र दिसतंय.
-
संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीत अनेक देशांनी रशियाने पुकारलेल्या युद्धाविरोधात आवाज उठवला असून युक्रेनला पाठिंबा दर्शवला आहे. (सर्व फोटो रॉयटर्स, एपी आणि सोशल मीडियावरुन साभार)
MI vs RCB: RCBचा मुंबई इंडियन्सवर ऐतिहासिक विजय, दिल्लीचा संघ थेट फायनलमध्ये; MIचा एलिमिनेटर सामना कोणाविरूद्ध?