-
वोलोडिमीर झेलेन्स्की हे नाव आता जगाला परिचयाचं झालं आहे. बलाढ्य रशियाला नडणारा युक्रेनचा नेता म्हणून आज वोलोडिमीर झेलेन्स्की यांना जगभरामध्ये ओळखलं जातंय. मात्र आज वोलोडिमीर झेलेन्स्की यांनी आपल्या एका भाषणातून युरोपियन देशांची मनं जिंकली आहेत.
-
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष असणाऱ्या वोलोडिमीर झेलेन्स्की यांनी आज युरोपियन संसदेच्या विशेष बैठकीसमोर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून भाषण केलं.
-
वोलोडिमीर झेलेन्स्कींनी दिलेल्या भावनिक भाषणानंतर युरोपियन संसदेतल्या सर्व सदस्यांनी उभं राहून या लढवय्या नेत्याला अभिवादन केलं.
-
वोलोडिमीर झेलेन्स्कींचं भाषण संपल्यानंतर तब्बल मिनिटभर युरोपियन संसदेमधील सदस्य टाळ्या वाजवत होते.
-
भावनिक साद घालण्यापासून ते पुतिन यांना रोकठोक सवाल विचारण्यापर्यंत अनेक मुद्दे वोलोडिमीर झेलेन्स्की यांच्या भाषणात होते.
-
“मी हल्ली कागद पाहून भाषण देत नाही. कारण आता कागद पाहून भाषण देण्याचा वेळ निघून गेलाय. इथे आम्ही लोकांचे प्राण वाचवण्यासाठी लढतोय,” असंही आपल्या भाषणादरम्यान वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी म्हटलंय.
-
वोलोडिमीर झेलेन्स्की नक्की असं काय म्हणाले आपल्या भाषणात की ज्यामुळे त्यांना तब्बल एका मिनिटाहून अधिक काळ स्टॅण्डींग ओव्हेशन देण्यात आलं? पाहूयात त्यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे…
-
“तुम्ही साथ दिली नाही तर युक्रेन एकटा पडेल,” असंही वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी युरोपियन महासंघासमोर दिलेल्या भाषणात म्हटलंय.
-
“आतापर्यंत आम्ही आमची ताकद दाखवून दिलीय. तुम्ही ज्याप्रमाणे आहात तसेच आम्ही आहोत,” असंही वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी युरोपियन देशांसोबतचं नातं सांगताना म्हटलंय.
-
“तुम्ही आम्हाला निराश करणार नाही हे आता सिद्ध करुन दाखवण्याची वेळ आहे. असं झालं तरच जीवन हे मृत्यूवर विजय मिळवले,” असं भावनिक आवाहन वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी केलं.
-
“आम्ही आमच्या भूमीसाठी आणि आमच्या स्वातंत्र्यासाठी लढत आहोत. आमची सर्व शहरांपासून आता संपर्क तुटलाय,” असं वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी सध्याची परिस्थिती सांगताना म्हटलं.
-
“आम्हाला कोणीही तोडू शकत नाही. आम्ही मजबूत आहोत, आम्ही युक्रेनियन आहोत,” असंही वोलोडिमिर झेलेन्स्की सांगायला विसरले नाहीत.
-
“आम्हाला आमच्या मुलांना जिवंत बघण्याची इच्छा आहे. आणि माझ्यामते ही रास्त इच्छा आहे,” असंही वोलोडिमिर झेलेन्स्की सांगायला विसरले नाहीत.
-
“आम्ही आमच्या हक्कांसाठी, आमच्या स्वातंत्र्यासाठी आणि आमच्या जीव वाचवण्यासाठी लढतोय. आता तर आम्ही केवळ अस्तित्व टीकवण्याठी लढत आहोत,” असंही वोलोडिमिर झेलेन्स्की म्हणाले.
-
पुतिन यांच्यावरही वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी निशाणा साधला. “काल इथे १६ मुलं मारली गेली. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन वारंवार हेच सांगत आहेत की ते एक प्रकारची लष्करी कारवाई करत आहेत ज्यात फक्त लष्कराची ठाणीच टार्गेट केली जात आहेत. पण तिथे मुलं होती,” असं वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी सांगितलं.
-
“ही मुलं नेमकी कोणत्या प्रकारची लष्करी कारवाई करत आहेत? कोणते टॅंक ते घेऊन जात होते. ते कोणत्या मिसाईल्स डागत होते? त्यांनी (रशियन हल्लेखोरांनी) काल १६ मुलांना मारलंय,” असं वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी सांगितलं.
-
“आम्ही जिवंत राहण्यासाठी लढत आहोत. तीच आमच्यासाठी सर्वात मोठी प्रेरणा आहे. यासोबत आम्ही लढा देत आहोत युरोपचे बरोबरीचे सदस्य होण्यासाठी. आम्ही तुमच्याशी जोडले गेलो, तर युरोपियन युनियन अजून सक्षम होईल. पण तुमच्याशिवाय युक्रेन एकटा पडेल,” अशी भावनिक साद वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी युरोपियन महासंघाला घातलीय. युरोपियन महासंघाच्या युरोपियन कमीशनच्या अध्यक्ष उर्सुला वॉन डर लेयन यांनीही अशाप्रकारे उभं राहून या भाषणानंतर टाळ्या वाजवल्या.
-
“मला माफ करा मी तुम्हाला गुड डे असं म्हणू शकत नाही,” असं म्हणत वोलोडिमिर झेलेन्स्की हात उंचावून स्क्रीन समोरुन निघून गेले. (सर्व फोटो एएनआय आणि ट्विटरवरुन साभार)
३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख