-
रशिया-युक्रेन युद्धाची संपूर्ण जगभरात चर्चा सुरु आहे. रशियाने युक्रेनविरुद्ध पुकारलेल्या युद्धाला काही ठिकाणांहून पाठींबा तर अनेकांकडून तीव्र विरोध दर्शवला जात आहे.
-
युद्धामुळे रशिया सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे. पण असेही काही भारतीय आहेत ज्यांनी आपल्या कर्तृत्वामुळे रशियन लोकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं.
-
राज कपूर : आपल्या अभिनय कौशल्याने ४० ते ६०च्या दशकात चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवणारा अभिनेता म्हणजे राज कपूर.
-
राज कपूर यांनी एक सो एक हिट चित्रपट देऊन प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं. त्यांचे केवळ भारतातच नाही तर जगभरात लाखो चाहते आहेत.
-
रशियातही राज कपूर यांचे चाहते आहेत. ‘श्री ४२०’ हा त्यांचा चित्रपट रशियात देखील प्रदर्शित करण्यात आला होता. या चित्रपटाला रशियन प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळालं होतं.
-
महात्मा गांधी : राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या विचारांचे अनुसरण जगभरातील लोकांकडून केले जाते.
-
महात्मा गांधींच्या विचाराने प्रेरित झालेले लोक रशियातही आहेत.
-
रशियाची राजधानी असलेल्या मॉस्को शहरात गांधीजींचा पुतळा देखील आहे. १९८८ साली महात्मा गांधींचा पुतळा मॉस्को शहरात उभारण्यात आला होता.
-
पंडित जवाहरलाल नेहरू : भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्यांच्या काळात रशियासोबत चांगले संबंध प्रस्थापित केले होते.
-
मॉस्को शहरातील एका चौकाला पंडित जवाहरलाल नेहरूंचे नाव देण्यात आले आहे.
-
सत्य साई बाबा : अध्यात्मिक गुरु म्हणून ओळखले जाणारे दिवंगत सत्य साई बाबा यांचे काही रशियन नागरिकही अनुकरण करतात.
-
रशियातील अनेक शहरांमध्ये सत्य साई बाबा यांचे अध्यात्मिक केंद्र आहेत.
-
देशातील सत्य साई बाबा यांचे अध्यात्मिक केंद्र असलेल्या पुत्तरपट्टी येथे देखील अनेक रशियन नागरिक येत असतात. येथे रशियन क्वार्टरही आहेत.
-
ऐश्वर्या राय बच्चन : १९९४ मध्ये विश्वसुंदरी राहिलेल्या अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनच्या सौंदर्याचे जगभरात लाखो चाहते आहेत.
-
ऐश्वर्या राय बच्चनने सौंदर्य आणि अभिनयाने रशियन नागरिकांनाही भुरळ पाडली आहे.
-
रशियामध्ये बुद्धिबळ या खेळाला विशेष महत्त्व आहे.
-
बुद्धिबळपट्टू विश्वनाथन आनंदचे देखील रशियामध्ये लाखो चाहते आहेत.
-
याशिवाय रवींद्रनाथ टागोर आणि जुबीन मेहता या भारतीयांनीही रशियन लोकांना भुरळ पाडली आहे. (सर्व फोटो : इंडियन एक्सप्रेस)

२३ फेब्रुवारी पंचांग: मेष, कन्या राशीचा रविवार जाणार आनंदात; तुमच्या नशिबात कोणत्या मार्गे येणार सुख? वाचा राशिभविष्य