-
युक्रेन आणि रशिया दरम्यानचं युद्ध आज आठव्या दिवशीही सुरू आहेत
-
(रशियाकडून सातत्याने युक्रेनच्या विविध शहरांवर क्षेपणास्त्रांचे मारे केले जात आहेत. फोटो सौजन्य- Reuters)
-
अशा परिस्थितीत युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वेळोवेळी त्यांची भूमिका स्पष्ट करून नागरिकांना हिंमत ठेवण्याचं आवाहन करत आहेत.
-
आज पुन्हा युक्रेनचे अध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की यांनी रशियावर टीका केली आहे.
-
झेलेन्स्की म्हणाले की, ‘आमचा देश आतापर्यंत दोन्ही महायुद्धे, दुष्काळ, होलोकॉस्ट, क्रिमियावरील कब्जा यातून वाचला आहे.’
-
‘या युद्धानंतर आम्ही आमच्या देशाची पुनर्बांधणी करू,’ असं वचन त्यांनी दिलं.
-
‘युक्रेनमध्ये झालेल्या सर्व नुकसानीची भरपाई रशिया देईल,’ असंही ते म्हणाले.
-
‘आम्ही युक्रेनला पुन्हा उभं करू. रशिया आता आमच्या देशात जो विनाश घडवतंय, त्याची किंमत त्यांना चुकवावी लागेल,’ असं वक्तव्य युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी केलंय.
-
युद्धानंतर युक्रेनची पुनर्बांधणी करण्याची शपथही त्यांनी घेतली.
-
‘आम्ही प्रत्येक घर, प्रत्येक रस्ता, प्रत्येक शहर पुन्हा उभं करू,’ असं झेलेन्स्की म्हणाले.
-
रशियन आक्रमणाच्या सुरुवातीपासून २ हजारहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे, असं युक्रेनच्या राज्य आपत्कालीन सेवेनं म्हटलंय.
-
झेलेन्स्की म्हणाले, “त्यांना अनेक वेळा आमचा नाश करायचा होता, पण ते ते करू शकले नाहीत. आम्ही खूप काही सहन केले आहे. आणि जर पुतिन यांना असे वाटत असेल की या युद्धामुळे युक्रेनियन घाबरतील, तुटतील किंवा आत्मसमर्पण करतील, तर ते आम्हाला ओळखत नाही. त्यांना आमच्याबद्दल काहीही माहिती नाही,” अशी टीका त्यांनी केली.
-
राष्ट्राला नुकत्याच केलेल्या संबोधनात झेलेन्स्की म्हणाले होते, “युक्रेनियन! प्रत्येक आक्रमणकर्त्याला हे माहित असलं पाहिजे की त्यांना येथे काहीही मिळणार नाही. कोणीही इथून जिंकून जाणार नाही. त्यांनी कितीही लोकं आणि कितीही शस्त्र गोळा केलीत, तरी ते सर्व नष्ट होतील.”
-
युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी बुधवारी रात्री आपल्या भाषणात व्लादिमीर पुतिन यांच्या रशियन सैन्याचे मनोबल सतत खालावत असल्याचा दावा केला.
-
आणि त्यांच्या सैन्याने आतापर्यंत ९,००० आक्रमणकर्त्यांना ठार मारलं असल्याचं सांगितलं.
-
‘आम्ही असं राष्ट्र आहोत ज्याने शत्रूचे मनसुबे एका आठवड्यात मोडून काढले,’ असं प्रतिपादनही त्यांनी केलं. (Photo – AP, Reuters)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”