-
रशिया – युक्रेन युद्धाची संपूर्ण जगभरात चर्चा सुरु आहे. (फोटो सौजन्य : इंडियन एक्सप्रेस)
-
रशियाने युक्रेनविरुद्ध पुकारलेल्या युद्धाला अनेक ठिकाणांहून तीव्र विरोध दर्शवला जात आहे. (फोटो सौजन्य : इंडियन एक्सप्रेस)
-
युक्रेनला पाठिंबा दर्शवण्यासाठी जगभरातून नागरिक पुढे येत आहेत. (फोटो सौजन्य : इंडियन एक्सप्रेस)
-
युक्रेनच्या समर्थनार्थ केम्ब्रिज शहरातील इमारतीला केलेली प्रकाशयोजना. (फोटो सौजन्य : रेन्ड प्लेटिंग्स /इन्स्टाग्राम )
-
इंग्लंडमधील एका जोडप्याने केम्ब्रिजमधील आपल्या घराला पिवळ्या आणि निळ्या या युक्रेनियन राष्ट्रध्वजाच्या रंगात रंगवलं आहे. (फोटो सौजन्य : रेन्ड प्लेटिंग्स /इन्स्टाग्राम )
-
रशियाने पुकारलेल्या युद्धाला विरोध दर्शवण्यासाठी आणि युक्रेनच्या समर्थनार्थ घराला अशाप्रकारे रंगवले असल्याचे घरमालक रेन्ड प्लेटिंग्स सांगतात. (फोटो सौजन्य : रेन्ड प्लेटिंग्स /इन्स्टाग्राम )
-
याचे फोटो रेन्ड प्लेटिंग्स यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केले आहेत. (फोटो सौजन्य : रेन्ड प्लेटिंग्स /इन्स्टाग्राम )
-
‘स्टॅण्ड विथ युक्रेन’ असे कॅप्शन देत इंग्लडमधील या जोडप्याने युक्रेनला पाठिंबा दर्शविला आहे. (फोटो सौजन्य : रेन्ड प्लेटिंग्स /इन्स्टाग्राम )
-
“आमचे युक्रेनमध्ये अनेक मित्र-मैत्रिणी आहेत. ती खरंच खूप चांगली आणि शौर्यत्व असणारी माणसे आहेत. आम्ही त्यांना विसरलो नसून त्यांच्या सोबत आहोत. हे सांगण्यासाठी आणि त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी आम्ही आमचे घर युक्रेनियन राष्ट्रध्वजाच्या रंगात रंगवलं आहे.”, असं इंग्लंडमधील हे जोडपं सांगतात.

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”