-
पंतप्रधान नरेंद्र मोदी काल पुणे दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांच्या हस्ते वेगवेगळ्या प्रकल्पांचं उद्घाटन झालं. या कार्यक्रमांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, उद्योगमंत्री सुभाष देसाई, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभेतील विरोधी पक्षेनेते देवेंद्र फडणवीस, महापौर मुरलीधर मोहोळ, पिंपरीच्या महापौर माई ढोरे या वेळी उपस्थित होते.
-
पुणे महापालिकेच्या प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंहासनाधिष्ठित पुतळय़ाचे अनावरण, मुळा-मुठा नदी सुधार आणि मुळा-मुठा नदीकाठ पुनरुज्जीवन प्रकल्पाचे उद्घाटन तसेच विजेवर धावणाऱ्या (ई-बस) १४० गाडय़ांचे आणि ई-बस आगाराचे लोकार्पण, व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण आर्ट गॅलरीचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी झाले. त्यानंतर ते कोथरूड येथील एमआयटी महाविद्यालयाच्या प्रांगणातील जाहीर कार्यक्रमाला उपस्थित राहिले.
-
मात्र कोथरुडमधील पंतप्रधानांच्या या कार्यक्रमाला उपस्थिती लावणाऱ्या सर्वासामान्य एका वेगळ्याच नियमामुळे प्रवेशद्वाराजवळच गोंधळात पडल्याचं आढळून आलं.
-
कोथरूड येथील एमआयटी महाविद्यालयाच्या प्रांगणात कार्यक्रमासाठी आलेल्या नागरिकांची पोलिसांकडून तपासणी करण्यात आली.
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी कार्यक्रमाला उपस्थित असल्याने कडेकोट सुरक्षा ठेवण्यात आली होती. मेटल डिकेट्कर्स, येणाऱ्या सर्वांची तपासणी पोलीस करत होते.
-
काळे कपडे, गॉगल, पायमोजे, मास्क, काळे शर्ट परिधान करणाऱ्यांना ते काढून टाकण्यास भाग पाडण्यात आले. कपडय़ांची तसेच वस्तूंची तपासणी केल्यानंतरच त्यांना सभास्थानी प्रवेश देण्यात आला.
-
अनेकांनी आणलेले काळे मास्कही त्यांना प्रवेश करताना बाजूला ठेवण्या सांगण्यात आले. पोलिसांनी गर्दीच्या ठिकाणी काळे मास्क घेऊन जाणाऱ्यांनाही प्रवेश दिला नाही.
-
त्यामुळे प्रवेशद्वाराबाहेर अशाप्रकारे काळे मास्क, मोजे आणि कपडे कचऱ्यात पडल्याचं दिसून आलं.
-
पंतप्रधान मोदींच्या सभेमध्ये काळं मास्क घातलेली एकही व्यक्ती दिसत नव्हती. यापूर्वीही मोदींच्या सभेला अशाप्रकारची सक्ती करण्यात आल्याची उदाहरण आहेत. (सर्व फोटो : पवन खेंग्रे, एक्सप्रेस फोटो)

५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ