-
महाराष्ट्रातील ग्रामीण भागात बैलगाडा शर्यतींची परंपरा फार पूर्वीपासून आहे. सांस्कृतिक आणि पारंपारिक यात्रा, जत्रा, सणाच्या निमित्तानं बैलगाड्यांच्या शर्यतींचे आयोजन केले जाते. (प्रातिनिधिक फोटो)
-
प्राणीमित्र संघटनेच्या दबावामुळे बैलगाडा शर्यती कायद्याच्या कचाट्यात अडकल्यामुळे काही वर्षे त्यावर बंदी घालण्यात आली होती. (प्रातिनिधिक फोटो)
-
त्यामुळे गेली कित्येक वर्ष गावातील जत्रा, सण-उत्सव बैलगाडी शर्यतीविना पार पडत होते.
-
परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या सशर्त परवानगीनंतर बैलगाडा शर्यत संपूर्ण महाराष्ट्रात उत्साहात आणि आनंदात सुरु करण्यात आली.
-
पुण्यात ‘खासदार केसरी बैलगाडा शर्यत’ आयोजित करण्यात आली होती.
-
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थिती दर्शवून बैलगाडा शर्यतीचा आनंद घेतला.
-
याचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
‘वसा, वारसा आणि विचार समृद्ध कृषी परंपरेचा!’, असं कॅप्शन त्यांनी या फोटोला दिलं आहे.
-
यावेळी बैलगाडा शर्यतीत सहभागी झालेल्या स्पर्धकांना त्यांनी प्रोत्साहन देखील दिले.
-
शर्यतीदरम्यान बैलगाडीवर चढून बैलांचं चऱ्हाट हाती घेण्याचा मोह सुप्रिया सुळेंना आवरता आला नाही.
-
बैलगाडा शर्यतीचा आनंद घेताना खासदार सुप्रिया सुळे.
-
(सर्व फोटो : खासदार सुप्रिया सुळे/ फेसबुक)

५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ