-
उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, मणिपूर आणि पंजाब या पाचही राज्यांमध्ये चुरशीने लढल्या गेलेल्या विधानसभा निवडणुकांची मतमोजणी सुरू झाली आहे.
-
पंजाबमध्ये आम आदमी पक्षाला बहुमत मिळणार असल्याचं चित्र दिसत आहे.
-
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाने पंजाबमध्ये मुख्यमंत्री कोण असावा यासाठी जनतेतूनच कौल घेतला होता.
-
यामध्ये खासदार भगवंत मान यांना मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवारीसाठी लोकांनी पसंती दर्शविली होती.
-
पंजाबमधील जनतेच्या मनातील या भावी मुख्यमंत्र्याबद्दल जाणून घेऊया.
-
भगवंत मान हे एक विनोदी कलाकार म्हणून लोकप्रिय आहेत.
-
१७ ऑक्टोबर १९७३ रोजी पंजाबमधील सतोज जिल्ह्यात त्यांचा जन्म झाला.
-
राजकारणात प्रवेश करण्याआधी भगवंत मान हे मनोरंजन क्षेत्रात विनोदी कलाकार म्हणून सक्रिय होते.
-
लाफ्टर क्वीन भारती सिंह, विनोदवीर कपिल शर्मा या कलाकरांना प्रसिद्धी मिळालेल्या ‘ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ या टीव्ही शोच्या पहिल्या सीझनमध्ये त्यांनी सहभाग घेतला होता.
-
विनोदी कलाकार म्हणून प्रसिद्धी मिळवलेले भगवंत मान हे एक व्यंगचित्रकार देखील आहेत.
-
२०११मध्ये मनप्रित बादल यांच्या पीपल्स पार्टी ऑफ पंजाब या पक्षातून त्यांनी राजकारणात प्रवेश केला.
-
संगरुरमधील लेहरगा विधानसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली मात्र ते पराभूत झाले.
-
नंतर त्यांनी आम आदमी पक्षात प्रवेश केला.
-
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत संगरुर लोकसभा मतदारसंघातून त्यांनी अकाली दलाचे ज्येष्ठ नेते सुखदेव सिंग धिंडसा यांचा दोन लाखांहून अधिक मतांनी पराभव केला होता.
-
मान यांच्यावर मे २०१७ मध्ये पंजाब प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली.
-
आम आदमी पक्षाचे संसदेत निवडून आलेले आणि पक्षाचे सभागृहात नेतृत्व करणारे ते एकमेव खासदार आहेत.
-
युवक तसेच ग्रामीण भागात मान हे लोकप्रिय आहेत.
-
पंजाबच्या राजकारणात येण्या अगोदर भगवंत मान यांनी आपलं संपूर्ण कुटुंबं सोडलं आहे.
-
४८ वर्षीय भगवंत मान यांचा २०१५ मध्ये घटस्फोट झाला आहे. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी असून ते परदेशात राहतात.
-
मुलांशी देखील मान यांचा फारसा संपर्क नसल्याची माहिती समोर आली आहे.
-
पंजाबमध्ये आम आदमी पक्षाची सत्ता आल्यास मुख्यमंत्री पदासाठी भगवंत मान यांचं नाव चर्चेत असेल. (सर्व फोटो : भगवंत मान/ फेसबुक)

महाशिवरात्रीला कुंभ राशीत दुर्मिळ त्रिग्रही योग निर्माण झाल्यामुळे ४ राशी जगतील राजासारखे जीवन! तिजोरीत मावणार नाही धन