-
उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या पाचही राज्यांमध्ये चुरशीने लढल्या गेलेल्या विधानसभा निवडणुकांची मतमोजणी सुरू झाली असून दुपारपर्यंत निकालांचा कल स्पष्ट होईल. (फोटो : ANI)
-
पंजाबमध्ये गेले काही महिने मोठ्या राजकीय घडामोडी पाहायला मिळाल्या.
-
कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा राजीनामा, नंतर चरणजित सिंग चन्नी मुख्यमंत्री झाले आणि अमरिंदर सिंग यांनी वेगळा पक्ष काढत भाजपासोबत हातमिळवणी केली. तर, आम आदमी पक्षाने पंजाबमधील निडवणूक चुरशीची केली होती.
-
पंजाबमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये आम आदमी पार्टीने बहुमताचा आकडा पार केल्यामुळे आपचे मुख्यमंत्री उमेदवार भगवंत मान यांच्या संगरूर येथील निवासस्थानी कार्यकर्ते जल्लोष करत आहेत. (फोटो : ANI)
-
पंजाबमध्ये आतापर्यंतच्या कलांनुसार ८९ जागांवर आम आदमी पक्ष आघाडीवर आहे. (फोटो : ANI)
-
आपण सर्वसामान्य नागरिक (आम आदमी) आहोत, पण जेव्हा ‘आम आदमी’ जागा होतो ना, तेव्हा सिंहासन हादरते. आजचा दिवस भारताच्या इतिहासातील एक महत्त्वाचा दिवस आहे, आम आदमी पार्टी आणखी एक राज्य जिंकत आहे असून ती राष्ट्रीय शक्ती बनली आहे, असं आपचे पंजाब सह-प्रभारी राघव चढ्ढा म्हणाले. (फोटो : ANI)
-
आप नेते भगवंत मान यांनी संगरूर येथील गुरुद्वारा गुरसागर मस्तुआना साहिबला भेट दिली. “पंजाबच्या लोकांनी परिवर्तनासाठी मतदान केले आहे, अशी आम्हाला आशा आहे,” असं ते म्हणाले.
-
मतमोजणी केंद्रांवर सुरुवातीच्या काही फेऱ्यांतच कल स्पष्ट होऊ लागले आणि फेरीगणिक आम आदमी पार्टीच्या उमेदवारांचे मताधिक्य वाढू लागताच कार्यकर्त्यांच्या उत्साहाला उधाण आले आहे. (फोटो : Indian Express / ट्विटर)
-
पंजाबमध्ये आम आदमी पार्टीकडून भगवतं मान हे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असतील हे जवळपास निश्चित झाले आहे.
-
नागरिकांकडून आलेल्या फोन कॉल्स व मेसेजमध्ये भगवंत मान यांचेच नाव आघाडीवर दिसून आले आहे.
-
पंजाबमध्ये कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला आहे.
-
भगवंत मान यांना २०१७ मध्ये पक्षाचे पंजाब प्रमुख बनवण्यात आले होते.
-
भगवंत मान पक्षाचे संसदेत निवडून आलेले एकमेव खासदार आहेत आणि पक्षाचे सभागृहात नेतृत्व करतात.
-
संगरूरमधून त्यांनी दोनदा लोकसभा निवडणूक जिंकली आहे.
-
राजकारणात येण्यापूर्वी ते प्रसिद्ध विनोदी कलाकार होते.
-
कॉमेडी विश्वात खूप नाव कमावल्यानंतर त्यांनी आम आदमी पार्टीत प्रवेश केला.
-
पंजाबच्या राजकारणात येण्या अगोदर भगवंत मान यांनी आपलं संपूर्ण कुटुंबं सोडलं आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : आम आदमी पार्टी / ट्विटर)

महाशिवरात्रीला कुंभ राशीत दुर्मिळ त्रिग्रही योग निर्माण झाल्यामुळे ४ राशी जगतील राजासारखे जीवन! तिजोरीत मावणार नाही धन