-
उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, मणिपूर आणि पंजाब या पाचही राज्यांमध्ये चुरशीने लढल्या गेलेल्या विधानसभा निवडणुकांची मतमोजणी सुरू आहे.
-
या पाचपैकी चार राज्यांमध्ये भाजपाला सत्ता कायम ठेवण्यात यश मिळाल्याचं चित्र दिसून येत आहे.
-
तर पंजाबमध्ये मात्र अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने सत्तापालट केला आहे.
-
या पाचही राज्यांच्या निकालाबरोबरच काही चिमुरडयांनीही सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं.
-
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या वेशात आलेली ही दीड वर्षाची चिमुरडी पाहा.
-
भगवे कपडे, रुद्राक्षाची माळ आणि मुंडन करत हुबेहूब योगी आदित्यनाथ यांच्यासारखा पेहराव करून ही चिमुरडी आपल्या वडिलांसोबत आली होती.
-
लखनौ शहरातील भाजपाच्या कार्यालयात आलेल्या या चिमुरडीच्या वेशाने आणि हातातील बुलडोझरने सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं.
-
पंजाबच्या मुख्यमंत्री पदाचे दावेदार मानल्या जाणाऱ्या भगवंत मान यांच्या पेहरावात आलेल्या या छोट्या मुलाला तुम्ही ओळखलं असेलच.
-
२०२०मध्ये दिल्लीच्या निवडणूक निकालावेळी हा चिमुरडा अरविंद केजरीवाल यांना समर्थन देण्यासाठी गांधी टोपी, तपकिरी रंगाचे स्वेटर, गळ्याभोवती काळ्या रंगाचे मफलर डोळ्यावर जाड फ्रेमचा चष्मा आणि मिशी असा हुबेहूब वेश करून आला होता.
-
‘छोटा केजरीवाल’ म्हणून प्रसिद्ध झालेला हा मुलगा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला होता.
-
आपचा हा चाहता आज देखील लाल रंगाचा सादर, मफलर, पिवळ्या रंगाची पगडी, मिशी आणि डोळ्यांवर चष्मा असा वेष करून भगवंत मान यांना समर्थन करताना हा चिमुरडा दिसला.
-
(सर्व फोटो : एएनआय / ट्विटर)
मुंबईतल्या अंधेरी स्टेशनवर कपल झालं बेभान; रोमान्स करताना अक्षरश: हद्दच पार केली, लाजीरवाणा VIDEO होतोय व्हायरल