-
पंजाब विधानसभेच्या निवडणुकीत अभूतपूर्व विजय मिळवणाऱ्या आम आदमी पक्षाचे नेते भगवंत मान यांनी आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.
-
खटकर कलान येथे भगवंत यांच्या शपथविधी सोहळ्याला आप समर्थकांनी मोठी गर्दी केल्याचं पहायला मिळालं.
-
पिवळ्या रंगाची पगडी, आकाशी रंगाचा कोट असा पेहराव भगवंत मान यांनी शपथविधीसाठी केलेला.
-
शपथविधीनंतर लगेचच भगवंत मान यांनी मंत्रालयामध्ये जाऊन पदभारही स्वीकारला.
-
बहुसंख्य मतदानोत्तर चाचण्यांनी पंजाबमध्ये सत्ता परिवर्तन होईल असे भाकीत वर्तवले होते, निकालही त्याच दृष्टीने लागला आणि आपची सत्ता राज्यात आली.
-
भगवंत मान यांच्या शपविधी सोहळ्याला आपचे संस्थापक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालही उपस्थित होते.
-
केजरीवाल यांच्यासोबतच आपचे नेते आणि दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदियांनीही या कार्यक्रमाला हजेरी लावली.
-
शपथविधी सोहळ्याआधी भगवंत मान यांनी शहीद भगत सिंग यांच्या पूर्णकृती पुतळ्याला अभिवादन केलं.
-
शपथविधीच्या कार्यक्रमाआधी केजरीवाल, भगवंत मान आणि राज्यपाल यांनी एकमेकांची भेट घेतली.
-
राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी भगवंत मान यांना मुख्यमंत्री पदाची शपथ दिली.
-
पंजाबच्या नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी शहीद भगत सिंग यांच्या मूळ गावी खतर कलन येथे पार पडला.
-
केजरीवाल आणि सिसोदिया यांची उपस्थितीही चांगलीच चर्चेत राहिली.
-
मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर भगवंत मान यांनी एक भाषण दिलं.
-
इश्क करना सबका पैदायशी हक है क्यों न इस बार वतन की सरजमीं को महबूब बना लिया जाए, या शहीद भगत सिंह यांच्या ओळी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच भगवंत मान यांनी उच्चारल्या.
-
या शपथविधीसाठी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
-
आपचे समर्थक मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला पिवळ्या पगड्या बांधून उपस्थित होते.
-
शपथ घेतल्यानंतर भगवंत मान यांनी मंत्रालयाकडे आपला मोर्चा वळवला.
-
नवीन मुख्यमंत्र्यांना पाहण्यासाठी मंत्रालयातील कर्मचारी अशाप्रकारे एकत्र आले होते.
-
भगवंत मान यांचं शासकीय पद्धतीने मंत्रालयामध्ये स्वागत करण्यात आलं.
-
तुमच्या प्रेमाचं कर्ज उतरवण्यासाठी मला अनेक जन्म घ्यावे लागतील, असं भावनिक वक्तव्यही भवगवंत मान यांनी मतदारांचे आभार मानताना केलं. तसेच त्यांनी निवडून आलेल्या आपल्या ९२ आमदारांना आपल्याला मत न देणाऱ्यांचीही सेवा करायची आहे त्यामुळे आपल्याकडून सत्तेचा उन्माद होणार नाही याची काळजी घ्या असं आवाहनही केलं.
-
“ज्या देशासाठी शहीद भगत सिंग फासावर चढले तोच देश सोडून लोक दुसऱ्या देशात जातायत. आता यापुढे आपल्याला आपला पंजाब सोडून परदेशात जायचं नाहीय. आपण इथेच राहून आपल्या देशात सुधारणा घडवू,” असं भगवंत मान यांनी आपल्या भाषणात म्हटलं. (सर्व फोटो एएनआय आणि आपच्या ट्विटरवरुन साभार)

“आता काय जीवच घेणार का?” महिलांनो तुम्हीही बाजारातून विकतच दही आणता का? थांबा अमूलच्या दहीचा ‘हा’ VIDEO पाहून धक्का बसेल