-
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गुरुवारी आपल्या मंतदारसंघामध्ये होळीचा उत्सव साजरा केला.
-
योगी आदित्यनाथ यांनी यावेळी एका छोट्या रथामधून लहानसा रोड शोही केली. यावेळी ते अगदी डोळ्यावर गॉगल, लावून नागरिकांना अभिवादन करत होते.
-
सोशल मीडियावर योगींच्या या होळी सेलिब्रेशनचे फोटो चांगलेच व्हायरल झालेत. यामध्येही त्यांच्या या हटके स्टाइलची चांगलीच चर्चा आहे.
-
उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपाने विजय मिळवल्यानंतर योगी पहिल्यांदाच आपल्या मतदारसंघात आले होते.
-
योगी आदित्यनाथ यांना पाहण्यासाठी त्यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती.
-
यावेळी योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते भक्त प्रल्हादाची पुजाही करण्यात आली.
-
फुलांची उधळण करुन योगी आदित्यनाथ यांनी नागरिकांसोबत होळी साजरी केली.
-
येथील छोट्या मुलांशीही योगींनी संवाद साधला. त्यांना चॉकलेटची भेटही मुख्यमंत्र्यांनी दिली.
-
स्थानिकांनी योगी आदित्यनाथ यांना खेळण्यातील बुल्डोझर भेट दिला. अतिक्रमणविरोधी धडक मोहीमांसाठी योगी सरकार प्रसिद्ध आहे. त्यामुळेच त्यांना हा बुल्डोझर भेट देण्यात आलाय. योगींच्या विजयानंतर राज्यात अनेक ठिकाणी बुल्डोझरमधून मिरवणुका काढण्यात आलेल्या. (सर्व फोटो एएनआय आणि ट्विटरवरुन साभार)

“रेल्वेने गेलेल्या, कधीही विमानात न बसलेल्या लोकांना विमानातून परत आणलं”, शिंदे गटाच्या खासदाराच्या विधानाची चर्चा