-
करोना संसर्गामुळे गेल्या दोन वर्षांपासून बंद असलेले कात्रज येथील राजीव गांधी प्राणिसंग्रहालय रविवारपासून पूर्णवेळ खुले करण्यात आले.
-
प्राणिसंग्रहालय खुले झाल्याच्या पहिल्याच दिवशी पर्यटकांनी हजारोच्या संख्येने भेट दिल्याने प्राणिसंग्रहालाय गजबजले होते.
-
तिकीट काढण्यासाठी प्राणिसंग्रहालायाबाहेर मोठ्या रांगा लागल्या होत्या.
-
व्यवस्थापनाकडून पर्यटकांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
-
सेल्फी, प्राण्यांची छायचित्रे काढण्याचा आनंदलुटत बच्चेकंपनीबरोबरच तरुणाईनेही उत्साहात या निर्णयाचे स्वागत केले.
-
पुणे महापालिकेचे राजीव गांधी प्राणिसंग्रहालय कात्रज येथे एकशे तीस एकर जागेवर साकारले आहे.
-
येथील खंदकात नैसर्गिक अधिवासात वावरणारे विविध प्रजातींचे प्राणी हे या संग्रहालयाचे वैशिष्ट्य आहे.
-
वाघ, सिंह, बिबट्या, चौशिंगा, अस्वल, हत्ती यासह विविध प्रजातींचे ३९६ प्राणी संग्रहालयात आहेत.
-
तसेच येथील सपरेद्यानात किंग कोब्रा, मगर यासह विविध प्रजातींचे सर्प आहेत.
-
महापालिकेच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या प्राणिसंग्रहालयात राज्यातील सर्वात मोठे प्राणिसंग्रहालय अशी ओळख असलेले राजीव गांधी प्राणिसंग्रहालय हे पुण्यातील आणि पुण्याबाहेरील पर्यटकांसाठी नेहमीच आकर्षणाचा विषय आहे.
-
परदेशी पर्यटकही आवर्जून या प्राणिसंग्रहालयाला भेट देतात.
-
पर्यटकांसाठी बॅटरीवर चालणाऱ्या गाड्याही इथे आहेत.
-
(सर्व फोटो – पवन खेंगरे, इंडियन एक्सप्रेस)

५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ