-
युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन चांगलेच चर्चेत राहिले आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या वैयक्तिक आयुष्याची देखील मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे.
-
या युद्धामुळे केवळ रशियावर निर्बंधच लागले गेले नाहीत, तर पुतिन यांच्या वैयक्तिक आयुष्यावरही परिणाम झाला आहे.
-
युद्धामुळे पुतिन यांच्या कुटुंबाला देखील अडचणींचा सामना करावा लागत आहे.
-
अशातच आता पुतिन यांची मोठी मुलगी डॉ. मारिया वोरोत्सोवाचा घटस्फोट झालाय.
-
राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची मुलगी डॉ. मारिया वोरोंत्सोवा, ही लहान मुलांमधील दुर्मिळ अनुवांशिक रोगांची विशेषज्ञ आहे.
-
युक्रेनवर आक्रमण करण्याच्या पुतिन यांच्या निर्णयाचा त्यांच्या कुटुंबावरही परिणाम झाला असून युक्रेनमध्ये युद्ध लादल्याने त्यांची मोठी मुलगी डॉ. मारिया वोरोंत्सोवा हिचा घटस्फोट झाला आहे, असा दावा रशियन तपास पत्रकार सर्गेई कानेव्ह यांनी केला आहे. डॉ. मारिया वोरोंत्सोवा यांचे लग्न एका पाश्चात्य देशात झाले होते.
-
शोध पत्रकार सर्गेई कानेव्ह यांनी दावा केला आहे की, ‘सेंट पीटर्सबर्गमध्ये एका महाकाय सुपर-मॉडर्न हॉस्पिटलचे बांधकाम सुरू आहे, ज्यामध्ये पुतिन यांच्या डॉक्टर मुलीचा मोठा वाटा आहे.’
-
सेंट पीटर्सबर्ग येथे बांधले जाणारे आलिशान रुग्णालय हे प्रामुख्याने युरोपीय देश आणि पर्शियन गल्फ देशांतील रुग्णांना आकर्षित करण्यासाठी होते.
-
पण, युक्रेन युद्धानंतर युरोपीय किंवा अरब देशांतील शेख या रुग्णालयात उपचारासाठी येतील का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
-
पुतिन यांची मुलगी डॉ. मारिया वोरोंत्सोवा आता तिचा डच उद्योगपती पती जोरीट फासेनपासून विभक्त झाली आहे आणि दोघांचा घटस्फोट झाला आहे.
-
गेले काही दिवस युक्रेनविरुद्धच्या युद्धादरम्यान पुतिन यांची कथित प्रेयसी आणि माजी जिमनॅस्टिकपटू अलीना काबेवा भूमिगत झाल्यानं जोरदार चर्चा सुरू होती.
-
त्यानंतर आता पुतिन यांच्या मुलीचा या युद्धामुळे घटस्फोट झाला आहे. (फोटो – सोशल मीडिया आणि इंडियन एक्सप्रेस)
“आमची मान शरमेने खाली…”, तनिशा भिसेंच्या मृत्यूनंतर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचा मोठा निर्णय; यापुढे डिपॉझिट…