-
पुणे : कात्रज भागात बेकायदा साठा करण्यात आलेल्या स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरमधून छोट्या सिलिंडरच्या टाकीत गॅस भरण्यात येत असताना आग लगली.
-
त्यानंतर एकापाठोपाठ २० सिलिंडरचे स्फोट झाल्याने परिसरात घबराट उडाली.
-
स्फोटाच्या दणक्याने सिलिंडर ठेवण्यासाठी बांधण्यात आलेली पत्र्याची शेड जमीनदोस्त झाली.
-
सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही.
-
अग्निशमन दलाच्या जवानांनी अर्ध्या तासात आग आटोक्यात आणली.
-
सागर पाटील असे या घटनेत जखमी झालेल्याचे नाव आहे. पाटील याचा कात्रजमधील गंधर्व लॉन्सशेजारील शेडमध्ये बेकायदा गॅस रिफिलिंगचा व्यवसाय आहे.
-
मोठ्या गॅस टाकीतून छोट्या टाकीत गॅस भरणा करून त्याची विक्री केली जात होती.
-
तेथे ८० ते १०० सिलिंडर ठेवण्यात आले होते.
-
सिलिंडरच्या स्फोटामुळे शेडच्या शेजारी असलेल्या एका घराच्या खिडकीला तडे गेले. (सर्व फोटो : आशिष काळे, इंडियन एक्सप्रेस)

५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ