-
IE 100 Most Powerful Indians: इंडियन एक्सप्रेसने जारी केलेल्या देशातील १०० सर्वात शक्तिशाली व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी याचं पहिलं नाव आहे. तर, दुसरीकडे योगी आदित्यनाथ हे देशातील सर्वात शक्तिशाली मुख्यमंत्री आहेत. संघप्रमुख मोहन भागवत हे देशातील तिसऱ्या क्रमांकाचे शक्तिशाली व्यक्ती आहेत. या यादीत अविवाहित अशी अनेक नावे आहेत.
-
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा या यादीत देशातील सहाव्या क्रमांकाचा शक्तिशाली व्यक्ती म्हणून समावेश करण्यात आला आहे.
-
देशातील तिसरे सर्वात शक्तिशाली व्यक्तिमत्व मोहन भागवत वैवाहिक जीवनापासून नेहमीच दूर राहिले.
-
या यादीत ममता बॅनर्जी ११व्या स्थानावर आहे. ममताही अविवाहित आहेत.
-
देशातील सर्वात शक्तिशाली व्यक्तींमध्ये भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस बीएल संतोष १४व्या क्रमांकावर आहेत. त्यांनीही लग्न केलेले नाही.
-
७५ वर्षीय नवीन पटनायक हे देखील अविवाहित आहेत. या यादीत ते ३३ व्या क्रमांकावर आहे.
-
पुढील नाव आहे हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांचे. खट्टर हे देशातील ४३वे सर्वात शक्तिशाली व्यक्ती आहेत. हरियाणाचे मुख्यमंत्री देखील अविवाहित आहेत.
-
या यादीत काँग्रेस खासदार राहुल गांधी यांचे नाव ५१ व्या क्रमांकावर आहे. राहुल गांधीनी लग्न केलेलं नाही.
-
लग्न न झालेल्या लोकांमध्ये पतंजलीचे स्वामी रामदेव यांचेही नाव आहे. इंडियन एक्सप्रेसच्या यादीत रामदेव ७८ व्या क्रमांकावर आहेत.
-
बसपा प्रमुख मायावती याही अविवाहित आहेत. सर्वात शक्तिशाली व्यक्तींच्या यादीत तो ९५ व्या क्रमांकावर आहे. (फोटो: PTI – Indian Express)
२३ फेब्रुवारी पंचांग: मेष, कन्या राशीचा रविवार जाणार आनंदात; तुमच्या नशिबात कोणत्या मार्गे येणार सुख? वाचा राशिभविष्य